फेसबुक हॅकचा पहिला बळी परभणीत, फेसबुक वापरकर्त्यांनो, सावधान!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

परभणी - फेसबुक अकाउंट हॅक करून त्याचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारी परभणी पोलिसांच्या सायबर शाखेकडे करण्यात येत आहे. काही दिवसांमध्ये दररोज अशा दोन ते तीन तक्रारी येत आहेत. या तक्रारींमध्ये आता वाढ होत आहे. दरम्यान, फेसबुक अकाउंट हॅक होऊ नये म्हणून नागरिकांनी फेसबुक अकाउंटचे पासवर्ड बदलून दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

फेसबुकने सर्वांचेच आयुष्य व्यापून टाकलेले आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ आले असले तरी त्याचा जपून वापर करायला हवा. काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीची बदनामी करायला मागे-पुढे पाहत नाहीत. फेसबुक हॅकिंगचे प्रमाण वाढलेले आहे. फेसबुकचे बनावट अकाउंट बनवून महिलांना अश्लील मेसेज केल्याच्या घटना घडत आहेत.

 परभणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस शाखेकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी येत आहेत. त्यात बनावट फेसबुक अकाउंटच्या सहाय्याने महिलांची बदनामी केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. पूर्वी आठवड्यातून एखादी, दुसरी तक्रार येत होती. परंतु, गेल्या महिन्यांपासून दररोज फेसबुक अकाउंट हॅक केल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याचबरोबर मोबाइल फोनवर अथवा कम्प्युॅटरवर फेसबुक अकाउंट चालू करताना स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड कोणाला दिसणार नाही याची दक्षता घ्यावी, मित्र, मैत्रिणीला आपले फेसबुक वापरण्यास देऊ नये व पासवर्ड शेअर करू नये, अशा दक्षतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.

दुसऱ्याच नावाने फेक फेसबुक अकाउंट तयार करणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा आहे. आपली वैयक्तिक माहिती, घरचा पत्ता, फॅमिली फोटो, शाळेचे नाव आदी फेसबुकवर कोणाला शेअर करू नका, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, फौजदार गंगाप्रसाद दळवी, सायबर पोलिस शाखेतील कर्मचारी संतोष व्यवहारे यांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News