भारतीय तरुणाची कामगिरी पाहून फेसबुकने दिले ५०० डॉलर बक्षीस 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

फेसबुकने भारतीय तरुणाची दाखल घेत सन्मान केला आहे. याशिवाय ५०० डॉलर बक्षीस देत फेसबुकच्या "हॉल ऑफ फेम"मध्ये स्थान दिले आहे. के. एस. अनंतकृष्णन असे या केरळच्या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे.

फेसबुकने भारतीय तरुणाची दाखल घेत सन्मान केला आहे. याशिवाय ५०० डॉलर बक्षीस देत फेसबुकच्या "हॉल ऑफ फेम"मध्ये स्थान दिले आहे. के. एस. अनंतकृष्णन असे या केरळच्या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो बी. टेकचा विद्यार्थी आहे. फेसबुकने त्याचा सन्मान करण्यामागे कारण देखील तेवढेच मोठे आहे. व्हॉट्सॅपमधील धोकादायक "बग" शोधून काढल्यामुळे अनंतकृष्णन याचा सन्मान करण्यात आला. 

या बगमुळे युजरच्या नकळत त्याच्या व्हॉट्सॅपवरुन फाइल्स पूर्णतः डिलिट करता येत होत्या. मात्र या १९ वर्षीय तरुणाने ही त्रुटी काढून सन्मान मिळवला आहे. अनंतकृष्णाने साधारण दोन महिन्यांपूर्वी हा ‘बग’ ओळखला होता. त्याने याबाबत व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकच्या अधिकाऱ्यांनाही माहिती दिली होती. याशिवाय समस्येवरचा योग्य उपाय देखील सांगितला होता.

फेसबुकने अनंतकृष्णाद्वारा सांगितलेला उपाय पडताळून पाहिला आणि दोन महिन्यानंतर ‘बग’ शोधल्याबद्दल आणि उपाय सुचवल्याबद्दल सन्मान करण्याचं ठरवलं. याशिवाय अनंतकृष्णाला आपल्या प्रतिष्ठित ‘हॉल ऑफ फेम’मध्येही जागा दिली. अप्लिकेशनमधील  उणिवा, बग किंवा व्हायरस सांगणाऱ्यांना ‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान दिलं जातं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News