महाराष्ट्रात गाजला युवा चेहरा, संसदेत घुमणार 'या' डॉक्टरांचा चेहरा 

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Thursday, 23 May 2019

पुणे : महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत सात डाॅक्टर रिंगणात होते. त्यापैकी सहाही जण आघाडीवर आहेत. हे सातहीजण एबीबीएस आहेत. त्यानंतर काहींची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 

पुणे : महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत सात डाॅक्टर रिंगणात होते. त्यापैकी सहाही जण आघाडीवर आहेत. हे सातहीजण एबीबीएस आहेत. त्यानंतर काहींची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 

यात संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांचा धुळ्यातून विजय निश्चित आहे. ते एक लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. भामरे हे कर्करोगतज्ञ आहेत. ठाण्याचे आमदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे दुसऱ्यांदा खासदार होत आहेत. ते अस्थिरोगतज्ञ आहेत. बीडमधून डाॅ. प्रीतम मुंडे, डाॅ. हिना गावित या दुसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारीत आहेत. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्राने चार डाॅक्टर निवडून दिले होते. ते पाचही जण पुन्हा संसदेत जाण्याच्या तयारीत आहेत.

शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे 50 हजारांनी आघाडीवर आङेत. नगरमधून विखे पाटील हे लाखाहून अधिक मतांनी पुढे आहेत. विखे हे न्यूरोलाॅजिस्ट आहेत. भाजपच्या डाॅ. भारती पवार या दिंडोरीतून पहिल्यांदा खासदार होत आहे. यात भाजपचे पाच, शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक खासदार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News