मुलांच्या सतत मोबाईल वापरामुळे डोळ्यांवर परिणाम - कोरगावकर

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 October 2019
  • शिबिराला उपस्थित विद्यार्थी, नेत्र तपासणी करताना डॉ विशाल पाटील

सावंतवाडी -  दहावीनंतरचे वय हे मुलांचे जबाबदारीचे वय असते. या वयाचा तुम्ही दुरुपयोग न करता चांगल्या गोष्टी आत्मसात करा. या वयात मोबाईलचा वापर वाढल्याने डोळ्यांचे विकारही वाढले आहेत. दैनिक सकाळने आपल्या पुढाकाराने नेत्रतपासणी शिबिर हा आयोजिलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आपले असे मत येथे व्यक्त केले. 

आज 'द पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड' यांच्यावतीने भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या सहकार्याने कळसुलकर इंग्लिश हायस्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयच्या परूळकर हॉलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला सौ. कोरगावकर उपस्थित राहिल्या होत्या.

यावेळी शिबिराला कळसुलकर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एन पी मानकर, दैनिक सकाळ सावंतवाडी विभागीय कार्यालयाचे वितरण व्यवस्थापक गुरुनाथ कदम, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ.विशाल पाटील, डॉ फर्नांडिस, दैनिक सकाळचे सावंतवाडी बातमीदार भूषण आरोसकर, शिक्षक यु आर पाटील, प्रसाद कोलगावकर, पी.एन चिटणीस, व्ही जी चव्हाण आदी उपस्थित होते.
 

खऱ्या अर्थाने दैनिक सकाळने मला तनिष्काच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि त्यानंतर आपल्या राजकारणाची सुरुवात झाली. दहावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल चा वापर वाढतो यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर परिणाम दिसून येत आहे. हे वय म्हणजे चांगले काय आणि वाईट काय हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवे. जीवनात चांगला दृष्टिकोन बाळगून यशस्वी व्हायला हवे. दैनिक सकाळ ने विविध उपक्रम घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. डॉ. पाटील म्हणाले रात्रीच्यावेळी मोबाईलचा वापर जास्त केल्याने नेत्र विकारही वाढत आहे. 

सौ. कोरगावकर, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News