विदेशी शिष्यवृत्ती अर्जासाठी विद्यार्थ्यांना १३ जुलैपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

शिक्षणक्रमांसाठी टाइम्स हायर एज्युकेशन किंवा क्‍यूएस रॅंकिंग दोनशेच्या आत असलेल्या विदेशी शैक्षणिक संस्थेमध्ये २०१९-२० मध्ये प्रवेश घेतला.

नाशिक - उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएच.डी. या उच्च शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असून, अर्जाची १३ जुलैपर्यंत मुदत आहे.

शिक्षणक्रमांसाठी टाइम्स हायर एज्युकेशन किंवा क्‍यूएस रॅंकिंग दोनशेच्या आत असलेल्या विदेशी शैक्षणिक संस्थेमध्ये २०१९-२० मध्ये प्रवेश घेतला असेल, घेणार असतील अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. इच्छूक विद्यार्थ्यांना www.dtemaharashtra.gov.in/foreignscholarship२०१९ या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी अभ्यासक्रम, अभियांत्रिकी व वास्तुकला शास्त्र, औषधनिर्माणशास्त्र यांतील पदव्युत्तर पदवी अथवा पदव्युत्तर पदविकेसाठी प्रत्येकी एक आणि या सर्व शाखाच्या डॉक्‍टरेटसाठीही प्रत्येकी एक, अशा १२ जागांसाठी तसेच अभियांत्रिकी अथवा वास्तुकला शास्त्रातील पदव्युत्तर पदवी व पदव्युक्तर पदविकासाठी चार आणि डॉक्‍टरेटसाठी चार अशा आठ शिष्यवृत्ती मिळेल.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News