18 कुत्र्यानी मिळून मिटवले मालकाचे अस्तित्व

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

व्यक्तीच्या १८ कुत्र्यांनीच त्याला खाऊन त्याचं अस्तित्व मिटवले होते. पण त्यांना मनुष्याचे केस, हाडे आणि कपडे मिळाले. 

कुत्र्यांची इमानदारी आपण पहिली असेल. अनेकदा आपण इमानदारीविषयी बोलताना कुत्र्याचे उदहारण देतो. पण, अमेरिकेच्या टेक्सासमध्ये कुत्र्यांनी असा काही कारनामा केला की, आता आपण कुत्र्याची उपमा द्यायची की नाही असा प्रश्न आपल्याला  पडणार आहे. 

टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीकडे एकूण १८ कुत्रे होती. काही दिवसापासून ५७ वर्षीय फ्रेडी मॅक हे बेपत्ता होते मे महिन्यात मॅकच्या एका नातेवाईकाने त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.

या नातेवाईकांनी सांगितले की, एप्रिलपासून त्यांनी मॅकला पाहिले नाही. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर असं आढळलं की, या व्यक्तीच्या १८ कुत्र्यांनीच त्याला खाऊन त्याचं अस्तित्व मिटवले होते. मॅकचे नातेवाईक जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा कुत्र्यांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले. कुत्र्यांचं लक्ष भरकटवून जेव्हा अधिकारी घरात शिरले तेव्हा त्यांना मॅक आढळले नाही. पण त्यांना मनुष्याचे केस, हाडे आणि कपडे मिळाले. 

हाडांचे तुकडे त्यांनी डीएनए टेस्टिंगसाठी पाठवले, ज्यातून समोर आलं की ते मॅकचे आहेत. मंगळवारी करण्यात आलेल्या डीएनए टेस्टमधून खुलासा झाला की, कुत्र्यांच्या विष्ठेत जे हाडांचे तुकडे सापडले ते ५७ वर्षीय फ्रेडी मॅक याचेच आहेत.पत्रकारांच्या माहितीनुसार मेक हे काही दिवसापासून आजारी होते.  त्यामुळे अजून तरी हे स्पष्ट झाले नाही की कुत्र्यांनी त्याना मारून  खाल्ले की मेक यांच्या मृत्यूनंतर त्याना खाल्ले गेले.  

डेप्युटी आरोम पिट्स यांच्या माहितीनुसार मिश्रित प्रजातीचे हे कुत्रे असून  या १८ कुत्र्यांनी मॅकचं कपडे आणि केसांसहीत संपूर्ण शरीर खाल्लं. कुत्र्यांनी २-५ इंचाच्या हाडांशिवाय काहीही  सोडलं नाही. मॅकच्या १८ कुत्र्यांपैकी दोघांना त्यांच्या साथीदारांनीच मारलं. १३ कुत्र्यांना त्यांच्या आक्रामक व्यवहारामुळे मारण्यात आलं तर बाकी तीन कुत्र्यांना दत्तक देण्यासाठी ठेवण्यास आलं आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News