पुण्यात महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय.च्या कार्यकारिणीची सभा संपन्न

नागनाथ पवार
Saturday, 27 July 2019

पुणे - महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय.ची सभा पुणे काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय.चे अध्यक्ष अमिर शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळेस महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय.चे प्रभारी रोहीत, प्रदेश उपाध्यक्ष दिग्विजय पाटील, राष्ट्रीय प्रतिनिधी विवेक गावंडे, अक्षय जैन, यांच्यासह प्रदेशचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बैठक जवळपास सहा तास चालली. यामध्ये प्रामुख्याने होऊ घातलेल्या महाविद्यालयीन निवडणुकी मधील रणनीती ठरविण्यात आली. प्रदेश पदाधिकारी यांना प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली असुन इतर समविचारी पक्षाबरोबर आघाडी ही प्रदेश पातळीवर चर्चा झाल्यानंतर होईल असे ठरविण्यात आले आले. त्याची जबाबदारी जिल्हा प्रभारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्याच बरोबर कॉलेज तेथे एन.एस.यु.आय. निवडणूक घोषणापत्र तयार करण्यात येणार असुन विविध विषय या सभेमध्ये चर्चीले गेले. यसंदर्भातली माहिती एन. जस. यु. आय. चे प्रदेश प्रवक्ते आभिजीत हाळदेकर यांनी दिली.

सभेमध्ये सर्व जिल्हाध्यक्ष यांनी निवडणूक संदर्भात आपल्या जिल्ह्यातील परिस्थितीची माहीती व त्यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर प्रदेश पदाधिकारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी सांगितले की ही निवडणूक काँग्रेसला संजीवनी देणारी ठरेल. यातुनच नव्या दमाचे विद्यार्थी कार्यकर्ते तयार होतील. सर्वांनी पुर्ण ताकदीने या महाविद्यालयीन निवडणुकीला समोरे जायचे आहवान केले. यावेळी दिग्विजय  पाटिल, विवेक गावंडे, भुषण रानभरे, अभिजीत हळदेकर, पार्थ मुंडे, शिवराज पार्टे, रुक्साना शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News