दहावी-बारावीची फेरपरीक्षा १७ जुलैपासून

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने मंडळामार्फत काही वर्षांपासून फेरपरीक्षा घेण्यात येते.

मुंबई - दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेरपरीक्षेस १७ जुलैपासून सुरवात होणार आहे. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा ९ ते १६ जुलैदरम्यान होईल.

दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने मंडळामार्फत काही वर्षांपासून फेरपरीक्षा घेण्यात येते. यंदा दहावीची फेरपरीक्षा १७ ते ३० जुलै, तर बारावीची फेरपरीक्षा १७ ते ३ ऑगस्टदरम्यान होईल. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र, परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News