तरूणांसाठी आनंदाची बातमी: बँकेची परीक्षा आता मराठी भाषेत देता येणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019

बँकेत नोकरी करण्यासाठी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेची परीक्षा आता इंग्रजी, हिंदी याच्या व्यतिरिक्त मराठी भाषेत परीक्षा देता येणार आहे. 

नवी दिल्ली: बँकेत नोकरी करण्यासाठी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेची परीक्षा आता इंग्रजी, हिंदी याच्या व्यतिरिक्त मराठी भाषेत परीक्षा देता येणार आहे. दक्षिण भारतामधील राज्यातील खासदारांनी बँकेच्या भरतीची परीक्षा स्थानिक भाषांमध्ये करण्यात यावी अशी मागणी केली होती. खासदारांची ही मागणी मान्य करत संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, आता बँकेची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा देता येणार आहे.

भारतीय बँकिंग सेवा परीक्षा या स्थानिक उमेदवारांच्या सुविधेसाठी इंग्रजी आणि हिंदीसह स्थानिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे. आपल्या भाषणात निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, आता बँकांच्या परीक्षा इंग्रजी आणि हिंदी यांच्यासह १३ स्थानिक भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या १३ भाषांमध्ये मराठी, कोकणी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मणिपुरी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. परीक्षा देणारे विद्यार्थी हे या स्थानिक भाषांपैकी कुठल्याही एका भाषेत परीक्षा देऊ शकतो असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.<

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News