दहावीसाठी लागू होणार प्रज्ञाशोध परीक्षा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  • १७ नोव्हेंबरला आयोजन - राष्ट्रीयस्तरावर पुढीलवर्षी

औरंगाबाद - इयत्ता दहावीसाठीच्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारी (ता. सहा) सुरवात झाली. राज्य परीक्षा परिषदेने ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. प्रथमस्तरावरील राज्यस्तरीय परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.

परिषदेने ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या वेळापत्रकासह शाळांना सूचनापत्रही पाठविले आहे. विद्यार्थ्यांना www.mscepune.inhttp://nts.mscescholarshipexam.in वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज शाळेमार्फत भरावयाचे आहेत. विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक असणारी माहिती, नॉनक्रिमीलियर शाळांनी एकत्रित करायची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातर्फे २०१२-१३ पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दहावीसाठी दोन स्तरावर घेण्यात येते. राज्यस्तरावरील परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.

तर, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा १० मे २०२० रोजी देशभरात होईल. राज्यस्तरीय परीक्षेत दोन विषयांची परीक्षा होते. ज्यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणीचा समावेश आहे.

१ जुलै २०१९ रोजी वय अठरा पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतो. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना सहा ते ११ सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन नियमित शुल्कासह अर्ज भरावा लागणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ ते १८ सप्टेंबर, अतिविलंब अर्ज भरण्याची प्रक्रिया १९ ते २५ सप्टेंबरपर्यंत असेल. 

असे राहील आरक्षण
एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्याकडून महाराष्ट्रासाठी सन २०१९-२० साठी सुधारित कोटा ७७४ विद्यार्थी इतका देण्यात आलेला आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी १५ टक्के, अनुसूचित जमातींसाठी ७.५टक्के, इतर मागास संवर्गासाठी २७ टक्के, सन २०१९-२० पासून ईडब्ल्यूएस घटकातील विद्यार्थ्यासाठी १० टक्के, तसेच संबंधित संवर्गात अपंगांसाठीचे ४ टक्के आरक्षण समाविष्ट आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News