या क्रिकेटपटूंने केली आत्महत्या, पोलिसांचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

भारताचे सात वन-डेमध्ये प्रतिनिधित्व केलेले तमिळनाडूचे शैलीदार स्ट्रोक प्लेयर आणि समालोचक व्ही. बी. चंद्रशेखर (वय ५७) यांनी गुरुवारी रात्री आत्महत्या केली.

चेन्नई : भारताचे सात वन-डेमध्ये प्रतिनिधित्व केलेले तमिळनाडूचे शैलीदार स्ट्रोक प्लेयर आणि समालोचक व्ही. बी. चंद्रशेखर (वय ५७) यांनी गुरुवारी रात्री आत्महत्या केली.

हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आधी आले होते, पण त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अनेक आजी-माजी खेळाडूंना धक्का बसला आहे.

चेन्नईतील मैलापूर परिसरातील राहत्या घरी हे घडले. पत्नीने बेडरूमचे दार वाजविले, पण प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून पाहिले असता पंख्याला मृतदेह लटकला होता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News