ब्रेकअपच्या त्रासातून प्रत्येकाला बाहेर पडायचं असतं मात्र ते कसं? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

आयुष्यात आपण एखाद्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करतो, आपलं आयुष्य त्या व्यक्ती भोवती कधी फिरू लागतं याची साधी कल्पनाही आपल्याला येत नाही. प्रेम जेव्हा आपल्या आयुष्यातून दूर निघून जातं तेव्हा  तुटलेल्या त्या हृदयाच्या तुकड्यांत स्वत:चं अस्तित्त्व शोधणं  अवघड होऊन जातं.

आयुष्यात आपण एखाद्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करतो, आपलं आयुष्य त्या व्यक्ती भोवती कधी फिरू लागतं याची साधी कल्पनाही आपल्याला येत नाही. प्रेम जेव्हा आपल्या आयुष्यातून दूर निघून जातं तेव्हा  तुटलेल्या त्या हृदयाच्या तुकड्यांत स्वत:चं अस्तित्त्व शोधणं  अवघड होऊन जातं.

ब्रेकअपनंतर होणाऱ्या त्रासातून प्रत्येकाला बाहेर पडायचं असतं मात्र ते कसं? हे विचार करण्याएवढी ताकद प्रत्येकात असतेच असं नाही. ज्या नात्याचा पूर्णपणे अस्त झालायं त्या नात्याबरोबर आपण नकळत  तडजोड करू पाहत असतो असे तज्ज्ञ सांगतात.

ब्रेकअप झाल्यानंतर काय कराल. 
- ब्रेकअप झालंय आता आपल्याला पुढे जायचं आहे, त्यातून बाहेर पडायचं आहे ही बाब मनावर ठळकपणे कोरा. 
-  आपल्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती कधी ना कधी परत येईल ही आशा ठेवून जगणं सोडा. आयुष्यात नेहमीच पुढे जाण्यावर लक्ष केंद्रीत करा. 
-  स्वत:ला दोष देणं, त्रास करून घेणं थांबवा.
-  नकारात्मक विचारांपासून नेहमीच स्वत:ला दूर ठेवा. 
 - स्वत:ला वेळ द्या. प्रत्येक गोष्टीतून एका फटक्यात बाहेर पडता येत नाही म्हणूनच लहानसे का होईना पण यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करा. 
-  तुमच्या भावना मनात कोंडून ठेवू नका. त्याला वाट मोकळी करून द्या. तुमच्या जवळच्या मित्र मैत्रीणींशी बोला. तुमच्या भावना लिहून काढा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News