मुंबईत सगळीकडे वाणिज्य शाखा जिंदाबाद

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Monday, 17 June 2019

आज पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी; ७ लाख ८३,८९६ अर्ज

मुंबई- मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया राबवली. यामध्ये दोन लाख ६२ हजार १२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी सात लाख ८३ हजार ८९६ एवढे अर्ज केले आहेत.

या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी (ता. १७) सायंकाळी जाहीर होणार आहे. या प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला सर्वाधिक पसंती दिली आहे.पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सायंकाळी महाविद्यालयांमध्ये प्रसिद्ध होणार आहे. यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया १८ ते २० जूनपर्यंत चालणार आहे. मुंबई विद्यापीठाने पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया २९ मे ते १५ जूनपर्यंत राबवली होती.

यामध्ये वाणिज्य शाखेतील परंपरागत आणि स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक अर्ज केले आहेत. त्यापाठोपाठ विज्ञान शाखा आणि कला शाखेतील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News