मुलाला गरम स्टाईलवर बसवून बेदम मारहाण करण्याचं कारण 'हे' होतं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

देशात तसेच महाराष्ट्रात आजही जातिवाद कायम असल्याचे आपल्याला पाहायाला मिळत आहे. अशीच एक जातीयवादावर आधारित असलेली घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे घडली.

आर्वी - देशात तसेच महाराष्ट्रात आजही जातिवाद कायम असल्याचे आपल्याला पाहायाला मिळत आहे. अशीच एक जातीयवादावर आधारित असलेली घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे घडली.

 मंदिरात खेळायला का गेला, म्हणून एका दलित मातंग समाजाच्या ८ वर्षाच्या चिमुकल्या मुलाला त्याची पॅण्ट काढून रखरखत्या उन्हात गरम झालेल्या स्टाईलवर बसवून, त्याला जबर मारहाण केली. स्टाईलवर बसवल्याने त्या मुलाच्या पार्श्वभागावर गंभीर इजा झाली आहे. या प्रकरणी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्वी येथे असलेल्या लक्ष्मीबाई वार्डनजिकच्या एक मंदिरात 8 वर्षीय चिमुकला खेळायला गेला असता, त्याला जाब विचारण्याच्या नादात याच परिसरात राहणाऱ्या आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे या कुणबी समाजाच्या इसमाकडून हा विकृत प्रकार घडला. पहिल्यांदा मंदिरात चोरी केल्याच्या आरोपावरून चिमुकल्याला जबर मारहाण केली, त्यानंतर त्याची पॅन्ट काढूल मंदिराच्या गरम झालेल्या स्टाईलवर बसवले. हा सर्व प्रकार घडत असताना त्या मुलाची आई त्याला वाचवण्यासाठी गेली असता, त्याच्या आईलासुध्दा त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. 

या सर्व घटनेनंतर मुलाचे वडील गजानन मधुकर खडसे वय ३२ वर्ष रा. आर्वी यांनी आर्वी पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दाखल केली.या प्रकरणी आरोपी उमेश ढोरेच्या विरुद्ध पोलिसांनी कलम ३२६, ३४२, ५०४ व भादवी अनुसुचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News