आजही "या" गावातील तरुणी 'पाळी'त गावाबाहेर..!

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

पेशंटच्या नाजूक परिस्थितीचा विचार करुन पोलिसांच्या आतला माणूस जागा झाला. जिवती पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक यांनी पाचशे रुपये बाळांतपण करणाऱ्या महिलेला दिले आणि म्हणाले, "हे पाचशे रुपये घ्या आणि कोंबड कापा" ती म्हणली, "कोंबडं नाही, बकरं कापाव लागेल." पोलीस  ठाणेदारांनी आणखी पाचशे रुपये दिले. ती म्हणाली की, "बकरं हजार रुपयात येत नाही" आजही इथल्या लोकांना माणसाच्या जीवापेक्षा त्यांच्या रूढी, परंपरेला अधिक महत्त्व देत होती.

पुरोगामी महाराष्ट्रात आजही अनेक अंधश्रद्धा, रूढी, परंपरेचा पगडा समाजात टिकुन आहे. महिलांना निसर्गाने दिलेली देणगी म्हणून आपन 'पाळी'कडे पाहत असलो तरी, आदिवासी समाजात आजही पाळी आलेल्या तरुणी, महिला आणि गरोदर मातांना गावाच्या वेशीबाहेर झोपडीवजा खोलीत ठेवले जाते. त्यांना अन्न देताना इतर व्यक्तीचा स्पर्शही होणार नाही याची दक्षता घेतली जाते. जेवणाचे प्लेट, पिण्याचे, आंघोळीचे पाणी झोपडीच्या उंबऱ्यावर ठेवले जाते. याचं ठिकाणी गरोदर मातांचे बाळंतपण केली जाते. अशा ठिकाणी आरोग्य सेविका येण्यास सक्त मनाई असते. तिने येऊन बाळंतपण केले तर तिला तिथेच अंघोळ करून बाहेर पडावे लागते. अन्यथा तिला गावाची वेस ओलांडू दिली जात नाही. एखाद्या आशा सेविकेने गरोदर माताचे बाळांतपण गावकऱ्यांच्या रूढी परंपरेच्या विरोधात जाऊन केली तर त्यांना दंड म्हणून एक बकरं अथवा त्या बकऱ्याची किंमत वसूल केली जाते. मातेला बाळंतपणानंतर सव्वा महिना वेशीबाहेर झोपडीत ठेवले जाते.पाळी सुरू असणाऱ्या मुलीस सात दिवस तेथेच रहावे लागते. 

26 जूनला चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात नोकेवाडा आदिवासी कोलाम गुंड्यात 20 वर्षीय तरुणी अय्युबाई बालू मडावी या महिलेने एका बाळाला जन्म दिला. गावकऱ्यांनी तिला वेशीबाहेर झोपडी ठेवले. अशावेळी अय्युबाईची प्रकृती बिघडत असताना तिच्यावर गावठी उपचार सुरु केले. तिची प्रकृती बिघडत होती, ही माहिती अंगणवाडी सेविकेला मिळताच तिने तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पण गावकऱ्यांनी मात्र तिचा सल्ला धूडकावून लावला. मातेची अवस्था नाजूक होती हे पाहून "आशा सेविके"ने आरोग्य विभागाला कळवले. पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्त कार्यवाही करुन तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलवण्यात आले.

मातेसोबत एका आशा सेविकेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पेशंटची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे गट विकास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या खिशातून पेशंटला वाटखर्चासाठी पैसे दिले. यावरुन किती भयानक दारिद्रे आदिवासी समाजात आहे याची जाणिव होते.

पेशंटला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभाग आणि पोलिसांची टीम पोहचली होती. पेशंट रुग्णालयात जाण्यास नकार देत होता, कारण रुग्णालयात बाळंतीला घेऊन जाणे सामाजाच्या रुढी, परंपरा विरोधात आहे. पेशंटला रुग्णालयात घेऊन जायचे असेत तर, बकरं कापाव लागत अशी प्रथा आहे. पेशंटच्या नाजूक परिस्थितीचा विचार करुन पोलिसांच्या आतला माणूस जागा झाला. जिवती पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक यांनी पाचशे रुपये बाळांतपण करणाऱ्या महिलेला दिले अणि म्हणाले, "हे पाचशे रुपये घ्या आणि कोंबड कापा" ती म्हणली, "कोंबडं नाही, बकरं कापाव लागेल." पोलीस  ठाणेदारांनी आणखी पाचशे रुपये दिले. ती म्हणाली की, "बकरं हजार रुपयात येत नाही" आजही इथल्या लोकांना माणसाच्या जीवापेक्षा त्यांच्या रूढी, परंपरेला अधित महत्त्व देत होती.  ही फारच गंभीर बाब आहे. काही दिवसांपूर्वी एका आशा सेविकेने तीन दिवस उपाशी राहून सेवा दिली होती. तिच्याकडे जेवणासाठी आणि वाटखर्चीसाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीत तिची काय अवस्था झाली असेल? 

 

पोलीस आणि आरोग्य विभागाने एकत्रित कार्यावाही करुन मातेला रुग्णालयात दाखल केले आणि तिचा जीव वाचला. पण नेहमी अशी कार्यवाही करणे शक्य होणार नाही. कारण समाजातील रूढी परंपरेच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीला गावकरी सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे आशा सेविका, महिला व बाल विकास, आरोग्य विभाग, पोलीस यांना गावात काम करणे अवघड जाईल.

तालूका, जिल्हा, विभागीय स्तरावरील रुग्णालयात पेशंटला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे रुग्ण भरती होण्यास नकार देतो. मातेसोबत आशा सेविकेला रुग्णालयात पाठवले तरी रुग्णालयाची माहिती मिळत नाही त्यामुळे आशा गोंधळून जातात. स्थानिक आशा सेविकेला रुग्णालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून नेमावेत तिला प्रति रुग्ण काही ठराविक रक्कम द्यावी. ज्यामुळे तिचा आणि रुग्णाचा किरकोळ खर्च तिला त्यातून भागवता येईल. तिला काही पैसेसुद्धा मानधन स्वरूपात शिल्लक राहतील. बाल मृत्यू आणि माता मृत्यू कमी करण्यासाठी गावातच विशेष प्रसुती गृह निर्माण कराव. त्यात एक जनरल रूम, एक डिलीव्हरी रूम, एक स्वंयपाक रूम, आणि शौचालय याचा समावेश करावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News