सायकलद्वारे युवकांनी केली पर्यावरणाची जनजागृती

राजेश दारव्‍हेकर
Sunday, 28 July 2019

सायकलद्वारे युवकांनी केली पर्यावरणाची जनजागृती
औंढा नागनाथ येथे स्‍वागत, जिंतूर येथील युवकांचा उपक्रम
येलदरी, जिंतुर, नांदेड, परभणी, वाशिम, नागपूर असा सायकलवरून प्रवास केला...

हिंगोली - औंढा नागनाथ शहरात जिंतूर येथील पाच युवकांनी सायकलद्वारे पर्यावरणाची जनजागृती करत 'झाडे लावा झाडे जगवा' असा संदेश देऊन पर्यावरणाचे महत्‍व नागरीकांना समाजावून सांगितले. या युवकांचे रविवारी (ता.28) नागनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सत्‍कार करण्यात आला.  

जिंतूर येथुन सायकलवरून पर्यावरणाचा संदेश देत पाच युवक औंढा येथे आले. त्यांनी रस्‍त्‍यालगतची गावे व औंढा  शहरात नागरीकांना पर्यावरण बद्दल माहिती सांगितली, तसेच झाडे लावा झाडे जगवा असा संदेशही दिला. 

झाडे का लावायची पर्यावरणाचा समतोल कशा पद्धतीने राखायचा याचेही सखोल मार्गदर्शन त्‍यांनी केले. या युवकात प्रमोद भालेराव, श्याम चव्हाण, सज्जाद पठाण, नागेश तडकसे, देवेंद्र अण्णा भुरे यांचा समावेश होता. 

या युवकांनी येलदरी, जिंतुर, नांदेड, परभणी, वाशिम, नागपूर असा सायकलवरून प्रवास केला.

या युवकांचे औंढा नागनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नगरपंचायततर्फे मुख्यअधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी हार घालुन स्वागत केले. यावेळी डॉ. लक्ष्मण लोखंडे, शरद पाटील, सतीश चोंढेकर, विष्णू जाधव, सखाराम देशमुख, रमेश जयस्वाल आदींची उपस्‍थिती होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News