औरंगाबादेत सोमवारी होणार विद्यार्थ्यांची पर्यावरण जागृती फेरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019

शहरातील सर्व शाळांचे हजारो मुले-मुली सोमवारी (ता. २४) अभूतपूर्व वृक्षदिंडी तथा पर्यावरण फेरी काढणार आहेत.

औरंगाबाद - शहरातील सर्व शाळांचे हजारो मुले-मुली सोमवारी (ता. २४) अभूतपूर्व वृक्षदिंडी तथा पर्यावरण फेरी काढणार आहेत. निसर्गाचा समतोल ढासळतोय, पर्जन्यमान कमी होत आहे म्हणून विक्रमी वृक्षलागवड करणे हा एक उपाय असून या माध्यमातून त्यासाठी जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

जिल्हा परिषद, महापालिका शिक्षण विभागातर्फे एकाच दिवशी शहरातील विविध भागांमध्ये भव्य पर्यावरण फेरीचे आयोजन केले आहे. या फेरीमध्ये सर्व पालक, संस्थाचालक, नागरिक, सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अपर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, सूर्यकांत हजारे, उपायुक्त (विकास), वृक्षसंवर्धन कक्ष अधिकारी रामचंद्र दावलवार, जिल्हा परिषदेच्या सीईओ पवनीत कौर, शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल, बी. बी. चव्हाण, श्रीकांत कुलकर्णी यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षसंवर्धन कक्षामार्फत कार्य चालू आहे.जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख १० हजार इतकी आहे, तसेच ८ हजार ५०० शिक्षकसंख्या आहे, हे लक्षात घेऊन १ जुलैला ‘एक मूल, एक वृक्ष’ ही योजना राबविण्यात येणार आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News