आयटीआय, पॉलिटेक्‍निकची प्रवेशप्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

जळगाव - शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व शासकीय तंत्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेत (पॉलिटेक्‍निक) ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. पॉलिटेक्‍निकची २१ जून, तर आयटीआयचे ३० जूनअखेर ऑनलाइन अर्ज भरणे, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थ्यांची शासकीय आयटीआय व पॉलिटेक्‍निक महाविद्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली आहे. 

दहावीचा निकाल लागल्याने पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्‍चित करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. नोकरी, व्यवसायासाठी चांगली संधी असल्याने यंदा आयटीआय व पॉलिटेक्‍निककडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याचे दिसत आहे. अर्ज भरणे सोयीचे आणि सुटसुटीत होण्यासाठी व्यवसाय शिक्षण व तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे ऑनलाइन वेळापत्रक जाहीर केले आहे.
 
‘आयटीआय’च्या २१ ट्रेडमध्ये ८६४ जागा 
शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, शासकीय आयटीआय तसेच विभागाने निश्‍चित केलेल्या अर्ज स्वीकृती केंद्रावर विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील शासकीय आयटीआयमधील २१ ट्रेडसाठी ८६४ जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळणार आहे.

‘पॉलिटेक्‍निक’मध्ये ६ ट्रेडच्या ५९३ जागा 
दहावीनंतर पारंपरिक शिक्षणासह व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. यंदा खानदेशातील ३४ महाविद्यालयात पॉलिटेक्‍निकच्या ९ हजार ४९४ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. उच्च तंत्र शिक्षण संचालनालयाने दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला होता. या अनुषंगाने जळगाव शहरातील शासकीय पॉलिटेक्‍निक महाविद्यालयात ६ ट्रेडच्या ५९३ जागांसाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 

जळगाव - शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व शासकीय तंत्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेत (पॉलिटेक्‍निक) ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. पॉलिटेक्‍निकची २१ जून, तर आयटीआयचे ३० जूनअखेर ऑनलाइन अर्ज भरणे, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थ्यांची शासकीय आयटीआय व पॉलिटेक्‍निक महाविद्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली आहे. 

दहावीचा निकाल लागल्याने पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्‍चित करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. नोकरी, व्यवसायासाठी चांगली संधी असल्याने यंदा आयटीआय व पॉलिटेक्‍निककडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याचे दिसत आहे. अर्ज भरणे सोयीचे आणि सुटसुटीत होण्यासाठी व्यवसाय शिक्षण व तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे ऑनलाइन वेळापत्रक जाहीर केले आहे.
 
‘आयटीआय’च्या २१ ट्रेडमध्ये ८६४ जागा -

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, शासकीय आयटीआय तसेच विभागाने निश्‍चित केलेल्या अर्ज स्वीकृती केंद्रावर विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील शासकीय आयटीआयमधील २१ ट्रेडसाठी ८६४ जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळणार आहे.

‘पॉलिटेक्‍निक’मध्ये ६ ट्रेडच्या ५९३ जागा -
दहावीनंतर पारंपरिक शिक्षणासह व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. यंदा खानदेशातील ३४ महाविद्यालयात पॉलिटेक्‍निकच्या ९ हजार ४९४ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. उच्च तंत्र शिक्षण संचालनालयाने दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला होता. या अनुषंगाने जळगाव शहरातील शासकीय पॉलिटेक्‍निक महाविद्यालयात ६ ट्रेडच्या ५९३ जागांसाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News