शाळेच्या पहिल्या दिवशी घोड्यावरून एंट्री; विद्यार्थांची रथातून सवारी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

पहिल्यांदाच घोड्यावर आणि रथातून फेरफटका मारल्यामुळे शाळेतली सर्वच मुलं खुप आनंदी झाली. सध्या पालक जिल्हा परिषद, नगरपालिका शाळांमध्ये मुलांना दाखल करण्यास अनुत्सुक दिसतात. त्यामुळे शिक्षकांना असे प्रयोग करावे लागत आहेत.

सातारा : शाळेचा आज पहिला दिवस. शाळेच्या पहिल्या दिवशी भीतीने अनेक लहान मुले रडून रडून शाळा डोक्यावर घेतात. मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत करण्यासाठी शाळा नवनव्या कल्पना लढवत असतात  साताऱ्यातील एका शाळेत चिमुकल्यांचं स्वागत चक्क घोड्यावर बसून करण्यात आल्याने सर्वत्र या शाळा प्रवेशाची जोरदार चर्चा होत आहे.

साताऱ्यातील जावळी तालुक्यात असणाऱ्या भणंग गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी पालकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी असे अनेक नवनवीन उपक्रम राबवताना दिसत आहेत. शिक्षकांनी पहिल्याच दिवशी, पहिलीच्या विद्यार्थांना घोड्यावर आणि रथातून सवारी घडवून आणली.

जावळी तालुक्यातील भणंग हे गाव दुर्गम भागातील असल्याने, या गावातील पालकांसाठी जवळच असणाऱ्या मेढा गावात उच्च शिक्षण देणारी पर्यायी शाळा आहे. मात्र या शाळेचा दर्जा वाढल्याने भागातील विद्यार्थी या शाळेत येत आहेत. 

पहिल्यांदाच घोड्यावर आणि रथातून फेरफटका मारल्यामुळे शाळेतली सर्वच मुलं खुप आनंदी झाली. सध्या पालक जिल्हा परिषद, नगरपालिका शाळांमध्ये मुलांना दाखल करण्यास अनुत्सुक दिसतात. त्यामुळे शिक्षकांना असे प्रयोग करावे लागत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News