डिप्लोमाची प्रवेशप्रक्रिया महिनाभर आधीच सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

नंदुरबार -  तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील अभियांत्रिकी डिप्लोमा (पदविका) अभ्यासक्रमासाठी केंद्रीय ऑनलाइन पध्दतीने अर्ज करता येणार असून, ही प्रक्रिया १४ सप्टेंबरपर्यंत चालू राहणार आहे. यासाठी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी गणित आणि विज्ञान विषयासाठी असलेली किमान ५० गुणांची मर्यादा ही अट यावर्षी काढून टाकण्यात आली आहे.

कमीत कमी ३५ टक्के गुणांनी दहावी पास होणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विविध घटकांसाठी आरक्षणाचा लाभ देखील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची होणारी धावपळ पाहता यंदा संचालनालयातर्फे ही प्रवेश प्रक्रिया महिनाभर आधीच सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना प्राथमिक अर्ज करता येणार असून निकालानंतर त्यातीत गुण अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News