इंग्लंडच्या सलामीवीरांची १५० धावांची भागीदारी, भारताची चिंता वाढली 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 June 2019
  • त्यांनी शेवटचे दोन सामने गमवले आहेत, त्यामुळे सेमीफायनलच्या दृष्टीने इंग्लंडसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे

बर्मिंगहॅम :  t World Cup मध्ये सुरु असलेला भारतीय संघाचा सामना इंग्लंडविरुद्ध सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास त्यांचे

सेमीफायनलमधील स्थान निश्चित होईल. तर इंग्लडला हा सामना जिंकावाच लागणार आहे . त्यांनी शेवटचे दोन सामने गमवले आहेत. त्यामुळे सेमीफायनलच्या दृष्टीने इंग्लंडसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ल्डकप सुरु झाल्यावर इंग्लंड सर्वात फेव्हरेट संघ होता. इंग्लंडने सुरुवात देखील दमदार केली होती.

पहिल्या 5 पैकी 4 सामन्यात त्यांनी विजय मिळवला होता. पण श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन सामन्यात पराभव झाल्यामुळे इंग्लंड अडचणीत आला आहे. सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी इंग्लंडला शिल्लक दोनपैकी किमान एका सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. यामुळेच इंग्लंडचा हा प्रवास इतका सोपा राहिला नाही. या सामन्यात बेयरस्टो ८७ धावांवर खेळत आहे.  तर रॉय ने ६३ धाव काढून आक्रमक खेळात आहेत.  भारतीय बॉलर्चा  मात्र एका  विकेटसाठी संघर्ष सुरु आहे . 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News