अभियांत्रिकी आणि फार्मसीमध्ये घडवा करिअर

हेमचंद्र शिंदे,
Friday, 5 July 2019

महाराष्ट्रातील शासकीय, स्वायत्त व खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर शाखेतील प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे २१ जून रोजी जाहीर झालेल्या सुधारित वेळापत्रकानुसार www.mahacet.org या संकेतस्थळावरून २४ जूनपासून सुरू आहे.

महाराष्ट्रातील शासकीय, स्वायत्त व खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर शाखेतील प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे २१ जून रोजी जाहीर झालेल्या सुधारित वेळापत्रकानुसार www.mahacet.org या संकेतस्थळावरून २४ जूनपासून सुरू आहे. या तीनही शाखांमधील प्रवेशाची कट ऑफ डेट पूर्वीप्रमाणेच १४ ऑगस्टपर्यंत आहे.

पूर्वीच्या १६ जूनच्या नोटिसीप्रमाणे वरील प्रक्रिया १७ जूनपासून सुरू होणार होती. परंतु ‘सार’ सेतूच्या गोंधळानंतर ७ दिवसांनी उशिरा प्रक्रिया सुरू होऊनही सर्व फेऱ्या पूर्वीप्रमाणेच १ ऑगस्टपर्यंत बसविल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक टप्प्यातील वेळापत्रकाकडे व प्रत्येक फेरीसाठी करावयाच्या कार्यवाहीकडे लक्ष द्यावे.

अभियांत्रिकीच्या फेऱ्या :
  पहिली फेरी ऑनलाइन विकल्प नोंदविणे : ६ ते ८ जुलै
  एआरसीमधील कार्यवाही : ११ ते १४ जुलै
  संस्थेमध्ये प्रवेश घेणे : १२ ते १५ जुलै
  दुसरी फेरी : ऑनलाइन विकल्प नोंदविणे : १७ ते १८ जुलै
  एआरसीमधील कार्यवाही : २१ व २२ जुलै
  संस्थेतील प्रवेश : २२ व २३ जुलै
  तिसरी फेरी (पसंतीक्रम) : २५ ते २६ जुलै
  एआरसी : २९ ते ३१ जुलै
  संस्थेतील प्रवेशाची कार्यवाही ः ३० जुलै ते १ ऑगस्ट 
याच पद्धतीनुसार फार्मसी व आर्किटेक्‍चर प्रवेशाचा कालावधी आहे. या पुढेही बदलणाऱ्या वेळापत्रकाकडे लक्ष द्यावे. प्रत्येक फेऱ्याअंती प्रवेशासाठी काय कार्यवाही करावी, याची पूर्ण तयारी व माहिती विद्यार्थ्यास पाहिजे. 

पसंतीक्रम भरणे : प्रत्येक फेरीसाठी संकेतस्थळावरून नव्याने पसंतीक्रम भरणे व ते कन्फर्म करणे आवश्‍यक असते. दुसऱ्या, तिसऱ्या फेरीत फक्त दोनच दिवसांचा कालावधी आहे. आजही अनेक विद्यार्थी सायबर कॅफेवर अवलंबून असतात. सकाळी ९ ते रात्री ९ या काळात सर्व्हरवर लोड येतो. अशा वेळी शक्‍यतो रात्री नऊनंतर किंवा सकाळी लवकर संगणकावरील कार्यवाही करणे हितावह ठरेल.

 प्रथम प्रवेश मिळाल्यानंतर : प्रथम प्रवेश मिळाला, मग तो कोणत्याही फेरीतील असो, अशा विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून प्रथम ‘प्रोव्हिजनल सीट अलौटमेंट लेटर’ डाउनलोड करून प्रिंट घ्यावी. या लेटरसह सर्व ओरिजनल कागदपत्रे व यापूर्वी अपलोड केलेल्या व सुविधा केंद्रातून शिक्का मारून दिलेल्या कागदपत्राच्या संचासह ‘एआरसी’कडे हजर राहावे. एआरसीमधून ऑनलाइन तयार झालेली रिसिट मिळेल. एआरसीकडून कागदपत्रांच्या शीटवर एआरसीचा स्टॅम्प व अधिकाऱ्याची सही करून पुन्हा रिसीट मिळेल. पहिला प्रवेश ज्या वेळी मिळेल, त्यावेळी एआरसीमध्ये हजर झाल्यानंतर एकदाच प्रवेश स्वीकृती शुल्क १ हजार रुपये सर्वांसाठी असून ते एआरसीमधून ऑनलाइन मोडने भरावयाचे आहे. एआरसी सुटीच्या दिवशीही उघडे असते.

पहिली फेरी : पहिल्याच विकल्पावर प्रवेश मिळाला तर तो ॲटोमॅटिक फ्रिज होतो. पहिला सोडून इतर विकल्प मिळाला, विद्यार्थ्याला तो आवडला आणि त्याने स्वतः फ्रिज केला तर त्यांनी प्रथम एआरसी कार्यवाही वरीलप्रमाणे पूर्ण करून त्यानंतर संस्थेत जाऊन प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला, ज्यांनी बेटरमेंट घेतली, त्यांनी फक्त एआरसीमध्ये जाऊन कार्यवाही करणे आवश्‍यक असून, ते विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र असतात. त्यांना संस्थेत जाण्याची आवश्‍यकता नाही. दुसरी फेरी वरीलप्रमाणेच असून पहिल्या पसंतीचा विकल्प मिळाला की तो फ्रिज होतो. स्वतः फ्रिज केलेल्यांनी एआरसी व नंतर संस्था प्रवेशाची कार्यवाही करावी. प्रथमच दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला, बेटरमेंट घेतली, त्यांनी एआरसी करावी. तिसरी फेरी पहिल्या फेरी व दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला नाही, यात प्रथमच मिळाला त्यामुळे प्रथम एआरसी कार्यवाही करावी व त्यानंतर प्रवेश घ्यावा. थोडक्‍यात, कोणत्याही फेरीत आपणास प्रथम प्रवेश मिळाला, अशा विद्यार्थ्यांने एकदा एआरसी कार्यवाही करणे व प्रवेश स्वीकृती शुल्क भरणे आवश्‍यक आहे, हीच पद्धत फार्मसी, आर्किटेक्‍चरसाठी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News