अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम फेरी सुरु

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 July 2019

मुंबई : राज्यातील शासकीय, स्वायत्त व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठीची तिसरी व अंतिम फेरीसाठी २९ ते ३० जुलै या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन विकल्प नोंदवून ते कन्फर्म करायचे आहेत. या तिसऱ्या फेरीतून निश्‍चित झालेले प्रवेश १ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहेत. प्रत्यक्ष संस्थेत जाऊन घ्यावयाचे प्रवेश ३ ते ५ ऑगस्टपर्यंत असून, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अभियांत्रिकी प्रवेशासाठी कट ऑफ डेट १४ ऑगस्ट आहे.

मुंबई : राज्यातील शासकीय, स्वायत्त व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठीची तिसरी व अंतिम फेरीसाठी २९ ते ३० जुलै या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन विकल्प नोंदवून ते कन्फर्म करायचे आहेत. या तिसऱ्या फेरीतून निश्‍चित झालेले प्रवेश १ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहेत. प्रत्यक्ष संस्थेत जाऊन घ्यावयाचे प्रवेश ३ ते ५ ऑगस्टपर्यंत असून, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अभियांत्रिकी प्रवेशासाठी कट ऑफ डेट १४ ऑगस्ट आहे. आजपर्यंत पहिल्या, दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला नाही असे सर्व विद्यार्थी.  यापूर्वी पहिल्या अथवा दुसऱ्या फेरीतच प्रवेश मिळाला व त्यांनी बेटरमेंट पर्याय निवडला असे सर्वजण. यापूर्वी पहिलाच विकल्प प्राप्त झाला, म्हणजेच तो फ्रीज झाला किंवा ज्यांना मिळालेला प्रवेश आवडला, त्यांनी स्वतः तो फ्रीज केला असे विद्यार्थी या फेरीसाठी पात्र नाहीत.

यापूर्वी प्रवेश मिळालेला आहे, त्यांनी तो स्वीकारून बेटरमेंट पर्याय निवडला आहे, त्यांना या फेरीमध्ये नव्याने विकल्प आपल्या आवडीनुसार नोंदवता येतात.  नोंदवलेल्या विकल्पामधून एखाद्या ठिकाणी बेटरमेंट होऊन प्रवेश मिळाला, तर पूर्वीचा प्रवेश आपोआप रद्द होतो. अशा वेळी नवीन मिळालेला प्रवेश घ्यावाच लागेल. विकल्प नव्याने मिळाला नाही, तर मात्र पूर्वीचा विकल्प अंतिम असेल. यापूर्वीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या फेरीत भाग घेऊनही कोणताच प्रवेश प्राप्त झाला नाही, म्हणजेच ज्यांना चॉइस नॉट अव्हेलेबल असे आले आहे, त्यांनी मात्र या फेरीत गांभीर्याने विकल्प नोंदविणे आवश्यक आहे. मला हीच संस्था, हाच कोर्स पाहिजे असा अट्टहास न धरता या फेरीतून प्रवेश मिळवलाच पाहिजे. असा निश्‍चय करून भरपूर विकल्प नोंदवणे आवश्यक आहे.

लक्षात ठेवा, शैक्षणिक शुल्क सवलत प्राप्त करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राऊंडच्या माध्यमातूनच प्रवेश मिळवावा लागतो. एससी, एसटी यांचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ होते. उत्पन्नाची अट नाही. व्हीजे, एनटी-१, एनटी-२, एनटी-३ यांचेही सर्व शैक्षणिक शुल्क माफ होते.  तसेच ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस यांना ५० टक्के सवलत मिळते, परंतु त्यासाठी प्रवेश मात्र राऊंडच्याच माध्यमातून मिळवावा लागेल. संस्था पातळीवरील जागेवर प्रवेश घेतल्यास शैक्षणिक शुल्क सवलत मिळत नाही. यापूर्वीच्या दोन्ही फेरीमध्ये काहीच मिळाले नव्हते, परंतु तिसऱ्या फेरीमध्ये प्रथमच प्रवेश मिळाला, त्यांनी प्रथम एआरसी म्हणजेच प्रवेश निश्चिती केंद्रावर हजर राहून येथील कार्यवाही पूर्ण करावी व नंतरच संस्थेमध्ये प्रवेशासाठी जावे.

 यापूर्वीच प्रवेश मिळाला, बेटरमेंट दिली, त्यांनी यापूर्वी एकदा एआरसी कार्यवाही पूर्ण केलेली आहे, त्यांना पुन्हा एआरसीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तिसऱ्या फेरीनंतर प्रवेश ज्या संस्थेत अंतिम झालेला आहे, त्या संस्थेत जाऊन शैक्षणिक शुल्क भरून तसेच सर्व मूळ कागदपत्रे व झेरॉक्सचा संच जमा करून प्रवेश घेण्याची कार्यवाही पूर्ण करावी. मूळ कागदपत्रे जमा करावी लागत असल्यामुळे त्यांच्या जादा झेरॉक्स प्रती काढून ठेवाव्यात. संस्थेकडे मूळ कागदपत्रे जमा केल्यानंतर त्याची रिसिट घ्यावी. याच पद्धतीने फार्मसी व आर्किटेक्चर यांचीही तिसरी अंतिम फेरी सध्या सुरू आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News