मुंबईतली अभियांत्रिकी प्रवेश दहा दिवस लांबणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019

तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) ही प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी धावून आले असून, लवकरच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. 

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतल्याने प्रवेशाची प्रक्रिया पुन्हा दहा दिवस लांबणीवर गेली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) ही प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी धावून आले असून, लवकरच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. ‘डीटीई’मार्फत यापूर्वी सर्व पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश केले जात होते; परंतु व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाचे व शुल्काचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्यात आला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News