कॅन्सरग्रस्त सोनालीने शेअर केला भावनिक फोटो

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Saturday, 6 July 2019
  • कॅन्सरला मात देत खचुन न जाता आपली नवी ओळख तयार करणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने एक मोनोक्रोम फोटो सोशल मिडीयावर शेअर करत फॅन्सचे आभार मानले आहे. 

मुंबई : कॅन्सरला मात देत खचुन न जाता आपली नवी ओळख तयार करणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने एक मोनोक्रोम फोटो सोशल मिडीयावर शेअर करत फॅन्सचे आभार मानले आहेत. या फोटो सोबत कॅन्सरच्या आजारामध्ये माझ्या सतत सोबत राहुन आजाराशी लढण्याची हिंमत दिल्यामुळे सोनालीने या पोस्टव्दारे आभार मानले. 

सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकांउटवर शेअर केलेल्या फोटोवर एक कॅप्शन देखील दिली आहे. ती म्हणाली की, 'नेहमीच तुमच्या वेदनांतून मजबूत व्हा, खुप आंनदात राहा, तुम्ही सगळे किती महत्वाचे आहात हे सांगू शकत नाही...धन्यवाद मला कॅन्सरच्या आजारातुन बाहेर निघण्यासाठी मला मदत केल्यामुळे..!

सोनाली याआधी सुध्दा कॅन्सरच्या उपचारादरम्यान होत असलेल्या त्रासबद्दल बोलली होती. एक वर्षाआधी बॉलिवुड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सरच्या आजाराबाबत माहिती झालं. सोनालीच्या कॅन्सरबाबत माहित झाल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला होता. न्युयॉर्कमध्ये उपचार केल्यानंतर कॅन्सरवर मात देत पुन्हा ती मुंबईमध्ये रवाना झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News