चांदिवलीत दिलीप लांडेंच्या विरोधात मनसैनिकांचा एल्गार

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019
  • बारस्कर यांच्या विजयाच्या घोषणेपेक्षा मनसैनिकांकडून लांडे यांच्या विरोधातील घोषणाच अधिक दिल्या जात होत्या. 

मुंबई - चांदिवली लोकसभा मतदारसंघात मनसेचे सुमित बारस्कर हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. मात्र, त्यांच्या पदयात्रे दरम्यान बारस्करांच्या विजयापेक्षा शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्या पराभवासाठी मनसैनिक अधिक आक्रमक झाल्याचे चित्र पहायला मिळते आहे.

सुमित बारस्कर यांची पदयात्रा आज चांदिवली मतदारसंघातील काजुपाडा विभागात सुरू होती. यावेळी बारस्कर यांच्या विजयाच्या घोषणेपेक्षा मनसैनिकांकडून लांडे यांच्या विरोधातील घोषणाच अधिक दिल्या जात होत्या. याबाबत मनसेचे कार्यकर्ते सागत तुळस्कर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “या विभागात लांडे यांना पर्याय नसल्याने मते दिली जात होती. मात्र, आता मतदारांकडे मनसेचे सुमित बारस्कर यांच्यारूपाने पर्याय आहे.

एका रिक्षावाल्याने नगरसेवक होऊन २०० कोटींची माया कशी जमवली आणि कंत्राटदारांना मारहाण करून आपली दहशत कशी बसवली हे विभागातील मतदारांना चांगले माहित आहे. त्यामुळे अशा उमेदवाराला मतदार कधीही मदत करणार नाहीत.” एकुणच मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दिलीप लांडे यांच्याविरोधातील प्रचार हेच चांदिवली मतदारसंघात मनेसेचे प्रमुख लक्ष्य असल्याचे या पदयात्रेतून जाणवत होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News