अकरावीचे विद्यार्थी आता नवीन पाठ्यपुस्तकांच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

विदर्भातील शाळा  बुधवारी (ता.२६) सुरू होणार आहेत. अकरावीचे वर्ग साधारणतः जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतील.

मूर्तिजापूर - राज्यातील अभ्यासक्रम सीबीएसई आणि आयसीएसईच्या समकक्ष करण्याच्या प्रयत्नात विविध विषय समित्यांची कार्यवाही अद्याप अपूर्णावस्थेत असल्यामुळे अकरावीचे विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया सुरू होऊनसुद्धा पाठ्यपुस्तकांच्या प्रतिक्षेत आहे. नविन शैक्षणिक धोरण अद्याप प्रक्रियावस्थेत आहे. मात्र, त्यापूर्वीच अकरावीचा अभ्यासक्रम बदलत आहे.

विदर्भातील शाळा  बुधवारी (ता.२६) सुरू होणार आहेत. अकरावीचे वर्ग साधारणतः जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतील. परंतु, बदललेल्या अभ्यासक्रमाचा समावेश असणारी कोणत्याच विषयाची  पाठ्यपुस्तके अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाहीत. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सत्रारंभी अकरावीच्या पहिल्या तासिकेला उपस्थित राहण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबाबत कमालीची उत्सुकता असते. पुनर्रचित अभ्यासक्रमासह नव्याने पाठ्यपुस्तक येत असेल, तर ही उत्सुकता आणखीनच ताणली जाते. अभ्यासक्रमाचा परिचय झाल्यानंतरची वर्गातील उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी वेगळी अनुभूती असता.

शिक्षकांसाठी तर ते एक आव्हान असते. प्रचंड विलब होत असलेली पाठ्यपुस्तके निश्चितपणे विद्यार्थ्यांचा हिरमोड करतील आणि शिक्षकांसमोर अडचणी निर्माण करतील, अशी प्रतिक्रिया काही भाषा शिक्षकांनी नोंदविली. विषयनिहाय तज्ज्ञसमित्यांच्या माध्यमातून पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. राज्य पाठ्यपूस्तक निर्मिती मंडळाचा मात्र, अकरावीचे नियमीत वर्ग सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील, असा दावा आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News