अकरावी विज्ञान प्रवेश प्रक्रीया सोमवारपासून; यंदाही केंद्रीय पध्दतीने होणार प्रवेश

विवेक मेतकर
Friday, 14 June 2019
  • मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पध्दतीने होणार आहेत.
  • ​वेश अर्ज भरताना कमीत कमी पाच महाविद्यालयांचे पर्याय विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहेत.

अकोलाः मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पध्दतीने होणार आहेत. प्रवेश अर्ज भरताना कमीत कमी पाच महाविद्यालयांचे पर्याय विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहेत. यासाठी बुधवारशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रकाश मुकुंद यांच्या अध्यक्षतेखाली समीतीची सभा घेण्यात आली. सभेला अध्यक्ष डॉ.विजय नानोटी, उपाध्यक्ष डॉ.अविनाश बोर्डे, उपाध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, महिला प्रतिनिधी भारती दाभाडे, सचिव गजानन चौधरी तसेच विलास अत्रे उपस्थित होते. 

अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेशासाठी अर्ज जिल्हा परिषद आगरकर विद्यालय, रेल्वे स्टेशन रोड येथे १३ ते १७ जूनपर्यंत सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात दाखवून मिळणार आहेत. 

असे आहेत अर्ज संकलन केंद्र 
साई सर्व्हिसेसः शॉप क्र.१२, शास्त्री स्टेडिअम, द्वारका कार डेकोरच्या बाजूला टॉवर चौक, अकोला 
तिरुपती झेरॉक्सः आरएलटी विज्ञान महाविद्यालय, अकोला 
मिनाक्षी इंटरनेट कॅफेः मल्हार हॉटेल समोर, वानखडे नगर, डाबकी रोड, अकोला 
महा ई सेवा केंद्रः शिवाजी महाविद्यालयासमोर, अकोला 
महा ई सेवा केंद्रः श्री इंटरनेट कॅफे, गजानन महाराज मंदिराजवळ, अकोला 

येथे ११ वाजता जाहिर होईल तसेच याच दिवशी http://caoakola.in या वेबसाईटवर सुध्दा पाहता येईल. 

प्रवेश प्रक्रीया वेळापत्रक 
कॅम्पस कोटा व मायनॉरिटी कोटा प्रवेश १३ ते १८ जूनपर्यंत होतील. सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज १३ ते १६ जूनदरम्यान मिळतील. त्याच काळात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. द्विलक्षी अभ्यासक्रम तसेच विशेष राखीव संवर्गाची यादी २१ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. संपूर्ण विद्यार्थ्यांची प्रवेश यादी २ जुलै रोजी समितीकडे सादर केली जाणार आहे. 

आरक्षणाचा लाभ 
केंद्रीय प्रवेश पद्धतीने दिल्या जाणाऱ्या प्रक्रियेत शासनाच्या आरक्षण धोरणानुसार प्रवेश दिले जातील. त्यामध्ये इतर मागासवर्गीय १९ टक्के, अनुसूचित जाती-१३, अनुसूचित जमाती-७, विमुक्त जाती-३, भटक्या जमाती (ब)-२.५, भटक्या जमाती (क)-३.५, भटक्या जमाती(ड)-२, विशेष मागास प्रवर्ग-२ टक्के याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. 

महापालिका क्षेत्रात ५३ महाविद्यालये आहेत. त्यामध्ये ८,१०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. त्याबाबत पालक, विद्यार्थ्यांनी बिनधास्त राहावे, असेही ते म्हणाले. प्रवेशासंदर्भात काही अडचण असल्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी, तसेच सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.   
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News