खू्द्द मुंबईतच अकरावीची प्रवेश यादी प्रसिद्ध न झाल्याने तारांबळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

मुंबई : अकोल्यातील अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अर्ज स्वीकारण्यासाठी देण्यात आलेली तीन दिवसांची मुदतवाढ गुरुवार (ता.२७) संपली असून, अंतिम प्रवेश याद्या सोमवार, १ जुलै रोजी जिल्हा परिषद आगरकर विद्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. मात्र, तांत्रिक कारणाने याद्या प्रसिध्द न झाल्याने पालकांची धावपळ उडाली आहे.

विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार व विद्यार्थ्यांच्या हितासाठी अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला तीन दिवसांची देण्यात आलेली मुदतवाढ २७ जून रोजी संपली आहे. प्रवेश अर्ज स्वीकारण्याच्या मुदतवाढीमुळे अंतिम प्रवेश यादी प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले असून, अंतिम प्रवेश याद्या १ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. मात्र तांत्रिक कारणाने अंतीम प्रवेश यादी  प्रसिध्द न झाल्याने पालकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली असल्याची दिसून आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News