अकरावीसाठी १६ हजार ४८४; विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019
  • यंदा प्रवेशासाठी ११० महाविद्यालयांत २९ हजार १०० एवढी प्रवेशक्षमता असणार आहे.
  • प्रवेश प्रक्रियेत दहावीच्या निकालानंतर वेळापत्रक १८ जून रोजी जाहीर करण्यात आले. मात्र अर्ज भाग १ व २ भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

औरंगाबाद - अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. १८ जून रोजी या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचे भाग-१ व भाग-२ भरण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यात १६ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

पुणे, मुंबईच्या धर्तीवर गेल्या वर्षीपासून औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. यंदाचे हे ऑनलाइन प्रवेशाचे तिसरे वर्ष असणार आहे. यंदा प्रवेशासाठी ११० महाविद्यालयांत २९ हजार १०० एवढी प्रवेशक्षमता असणार आहे. प्रवेश प्रक्रियेत दहावीच्या निकालानंतर वेळापत्रक १८ जून रोजी जाहीर करण्यात आले. मात्र अर्ज भाग १ व २ भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना चार जुलैपर्यंत अर्जाचा भाग एक व दोन भरण्यासाठी मुदत देण्यात आली. पाच जुलै रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. 

सहा आणि आठ जुलैदरम्यान दुरुस्ती करता येईल. पहिली सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही १२ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जे विद्यार्थी पात्र ठरतील त्यांनी १३ ते १६ जुलैदरम्यान आपले प्रवेश निश्‍चित करायचे आहेत. १६ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील आणि कट ऑफ जाहीर करण्यात येईल. यानंतर १७ आणि १८ जुलै  दरम्यान विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करता येईल. दुसरी सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही २२ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News