अकरावी प्रवेशाला आता विलंब शुल्क नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

केंद्रीय प्रवेश पध्दतीनुसार अकरावीमध्ये प्रवेश प्रक्रीयेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये विलंब शुल्क आकारण्यात येत होते.

अकोला - केंद्रीय प्रवेश पध्दतीनुसार अकरावीमध्ये प्रवेश प्रक्रीयेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये विलंब शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे मंगळवार (ता.२५) विलंब शुल्क न आकारण्यासंदर्भाचे पत्र विद्यार्थी संघटनांना दिले. केंद्रीय प्रवेश पध्दतीनुसार अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर रुपयांचे विलंब शुल्क आकारण्यात येवू नये, प्रवेश अर्जावर आहे तेवढेच शुल्क आकारण्यात यावे प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी प्रवेश घेत असलेल्या प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या माहिती करीता सूचना फलक लावण्यात यावे, अशा मागण्या विद्यार्थी संघटनांनी केल्या होत्या.

दरम्यान, मंगळवारी (ता.२५) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी विद्यार्थी हिताच्या मागण्यांना प्राधान्य दिले असून, विद्यार्थी संघटनांच्या लढ्याला यानिमित्ताने यश आले आहे. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाअध्यक्ष अमोल सिरसाट, महानगर अध्यक्ष आकाश गवई, महानगर महासचिव पवन गवई, अक्षय गायगोले, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, अंकुश गावंडे, अक्षय गोपणारायन, प्रशिस खंडारे,आदींनी अथक परिश्रम घेऊन विद्यार्थी हिताचा लढा यशस्वी केला.

प्रवेशासाठी तीन दिवस मुदत वाढ 
महानगरातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत सन २०१९-२० साठी महानगरातील केंद्रीय प्रवेशासाठी अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी २७ जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह प्रवेश अर्जाची विक्री व स्वीकृती २७ जून २०१९ पर्यंत सकाळी १० ते ४ या वेळेत साई सर्व्हिसेस शॉप नं.१२ शास्त्री स्टेडीयम कॉम्प्लेक्स, टॉवर चौक, अकोला येथे करण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News