विजेचा धक्का लागून तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019
  • विजेच्या खांबावर दुरुस्ती करताना महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अमोल सांबारे (वय 25 रा. कात्रज) असे त्यांचे नाव आहे.

पुणे : बिबवेवाडी शांतिनगर सोसायटीसमोरील मुख्य लाईनवर स्पार्किंग होत असल्य़ाचे तेथील लोकांच्य़ा लक्षात आले. अपघाताची शक्‍यता लक्षात घेऊन, तेथील रहिवाशांनी महावितरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधून, विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांना याची माहीती दिली.

विद्युत केंद्रातील कर्मचारी अमोल सांबारे व त्यांचा सहकारी दुरुस्तीसाठी आले. त्य़ा ठिकाणी काम सुरू असताना सांबारे यांना विजेचा धक्का बसला. महावितरण, अग्निशामक दलाच्या जवानांना पोचण्यासाठी अर्धा तास लागला.

तोपर्यंत सांबारे खांबावरच होते, खासगी क्रेनच्या साह्याने त्यांना खाली काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे.

महावितरणाच्य़ा विभागाचे कार्यकारी अभियंता मधुसूदन बरकडे यांनी सांगितले, की अमोल सांबारे यांचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाला का इतर कारणाने झाला हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News