विद्युत जामवाल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

अभिनेता विद्युत जामवालचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘जंगली’ चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर फिका पडला.

अभिनेता विद्युत जामवालचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘जंगली’ चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर फिका पडला.

मात्र, या चित्रपटामधील विद्युतचे ॲक्‍शन सीन्स कमालीचे होते. आता पुन्हा एकदा त्याच्या ॲक्‍शनचा थरार रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. ‘कमांडो ३’ चित्रपटासाठी विद्युत सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे. येत्या ६ सप्टेंबरला हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर दाखल होत आहे.

‘कमांडो’ चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांमध्ये विद्युतच्या ॲक्‍शन सीन्स आणि अभिनयाने सिनेरसिकांना थक्क केलं होतं. आता या तिसऱ्या भागात विद्युतबरोबर अदा शर्मा, अंगिरा धरा आणि गुलशन देवैय्या दिसणार आहेत. आदित्य दत्त दिग्दर्शित ‘कमांडो ३’मध्ये विद्युत कोणत्या नव्या रुपात दिसतो हे पाहणं औत्सुक्‍याचं ठरेल. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News