निवडणुका आल्या आणि आल्याच

अरुण चिंचणगी
Sunday, 21 April 2019

निवडणुका आल्यात तोंडावर म्हणुन....
मनी माझ्या प्रश्न पडलाय
निवडणुका आल्यात तोंडावर म्हणुन,
किव येते भोळ्याभाबड्या जनतेची
त्यांच्या सहनशीलतेचा विचार करुन!

येतात किती जातात किती
करता का हो हिशोब पाच वर्षातला? 
जनतेची सेवा करतात किती अन् खातात मेवा किती?
लावता का ताळेबंद अर्थसंकल्पातला?

दरवेळी नेते करतात डोंगर उभे आश्वासनांचे
अन् करतात भलामोठा जाहीरनामा प्रसिद्ध,
असेल धमक तर करा ना पूर्तता, केलेल्या आश्वासनांची
अन् व्हा पुन्हा निवडणुकीसाठी अभिमानाने सिद्ध!

निवडणुका आल्यात तोंडावर म्हणुन....
मनी माझ्या प्रश्न पडलाय
निवडणुका आल्यात तोंडावर म्हणुन,
किव येते भोळ्याभाबड्या जनतेची
त्यांच्या सहनशीलतेचा विचार करुन!

येतात किती जातात किती
करता का हो हिशोब पाच वर्षातला? 
जनतेची सेवा करतात किती अन् खातात मेवा किती?
लावता का ताळेबंद अर्थसंकल्पातला?

दरवेळी नेते करतात डोंगर उभे आश्वासनांचे
अन् करतात भलामोठा जाहीरनामा प्रसिद्ध,
असेल धमक तर करा ना पूर्तता, केलेल्या आश्वासनांची
अन् व्हा पुन्हा निवडणुकीसाठी अभिमानाने सिद्ध!

दारू, मटण अन् पार्ट्या देवुन
घेतात फायदा दुबळ्यांच्या असहाय्यतेचा,
लाज कशी वाटत नाही मनाला
ठेवताना गहाण सदसदविवेकबुद्धीला?

अरे बस्स करा आता हा ढोंगीपणा
जरा तरी चाड बाळगा,
माणूस आहे मानवतेची 
जरा तरी लाज बाळगा!

होतोय या कलुषित राजकारणाने समाजाचा रहास
आवळला जातोय घट्ट दिवसेंदिवस मानवतेचा फास,
द्याल झुगारून जेंव्हा गट-तट अन् धराल समाजसेवेची कास
पोहचेल देश प्रगतीपथावर जेंव्हा कराल निःस्वार्थ समाजकारणाचाच अट्टाहास!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News