#election2019 आज फक्त या पाच जागांवर असेल सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष

सुरज पाटील, यिनबझ
Wednesday, 23 October 2019

देशासह महाराष्ट्र विधान सभा निवडणुकांचे निकाल आज जाहिर होत आहेत. त्याच पार्शभूमीवर आज विधानसभेवर कोणाची सत्ता येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये ज्यांनी आपलं प्रबळ नेतृत्व गाजवलं, त्या भाजपाला पुन्हा सत्ता मिळणार की महाराष्ट्रा राजकारणात दमदार एंट्री केलेल्या ८० वर्षाच्या तरुणाची सत्ता येणार हे पाहाणे तितकेच गरजेचे आहे.

देशासह महाराष्ट्र विधान सभा निवडणुकांचे निकाल आज जाहिर होत आहेत. त्याच पार्शभूमीवर आज विधानसभेवर कोणाची सत्ता येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये ज्यांनी आपलं प्रबळ नेतृत्व गाजवलं, त्या भाजपाला पुन्हा सत्ता मिळणार की महाराष्ट्रा राजकारणात दमदार एंट्री केलेल्या ८० वर्षाच्या तरुणाची सत्ता येणार हे पाहाणे तितकेच गरजेचे आहे.

या पाच जागांवर असेल सगळ्या महाराष्ट्राच लक्ष...

१. परळी मतदार संघामध्ये असलेल्या पीएम आणि डीएम यांच्यातील लढत
विधानसभा 2019 ची निवडणूक ही अनेक कारणांनी गाजली आहे. त्यातलं मुख्य कारण म्हणजे भाऊबहिणींच्या भावनिक राजकारणामुळे. परळी मतदान संघामध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या धनंजय मुंडे यांची परस्पर विरोधी लढत होणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही हजारांच्या मताधिक्याने पंकजा मुंडे जींकून आल्या होत्या. तर यंदाही त्यांच्यात चुरशीची लढत प्रचारादरम्यान पाहायला मिळाली. 

२. कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये असलेल्या रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील लढत
कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये देशाच्या राजकारणात महत्वाचा वाटा उचलणारे आणि राष्ट्रवादी क़ॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा समजले जाणारे शरद पवार यांचा नातू रोहित पवार आणि सलग 1995 पासून ज्या पक्षाने या मतदार संघातून जिंकून येण्याचा सपाटा लावला आहे, त्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम शिंदे यांच्यात ही लढत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या मतदार संघामध्ये दोन सभा घेतल्या आहेत, तर शरद पवारांनीदेखील या मतदार संघामध्ये प्रामुख्याने लक्ष घातले आहे.

3. कणकवलीतील नितेश राणे आणि सतीश सावंत यांच्यातील लढत
संपूर्ण महाराष्ट्रभर लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला घेऊन शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती झाली आहे, मात्र कणकवली या एका मतदार संघामध्ये मात्र शिवसेना विरूध्द भाजपा अशी लढत रंगली आहे. स्वाभिमानी पक्षाचे नेते नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपाच्या तिकीटावर कणकवलीची जागा लढवण्यास इच्छूक झाले तर शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी त्यांच्या विरोधात कंबर कसली आहे. नितेश राणे हे विद्यमान आमदार असल्याने ते लोकांपर्यंत पोहोचले आहेत, तसेच नारायण राणेंनी त्यांच्या मागे उभे केलेली बड्या नेत्यांची फौज हेही त्यांच्या वियजाचे संकेत असणार आहेत.

4. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरुध्द किशोर शिंदे यांच्यातील लढत
पहिल्यांदा विधानसभेची निवडणुक लढणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरुध्द कोथरूड येथील मनसेचे प्रबळ स्थानिक उमेदवार किशोर शिंदे यांची लढत रंगणार आहे. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यांच्या इतर सहकारी पक्षांनी मनसेला पाठिंबा दर्शवला आहे, तर भाजपने मागच्या पाच वर्षात तयार केलेलं नेटवर्किंग, मॅनेजमेंट आणि खुद्द चंद्रकांत पाटील या मुद्द्यांना पुढे करत आपली सरशी लावली आहे.

5. सातरा लोकसभा मतदार संघातील उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील यांच्यातील लढत
विधान सभेचा डंका वाजत असताना त्यातच राष्ट्रवादीतून खासदार असलेले सातारा मतदार संघाचे उमेदवार उदयनराजे भोसले विरूध्द राष्ट्रवादीचे वस्ताद नेत्यांपैकी एक समजले जाणारे श्रीनिवास पाटील यांच्या लोकसभेचा निकालही उद्याच असणार आहे. राष्ट्रवादीतून खासदार म्हणून निवडून आल्यावर काही कारणांमुळे पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे विरुध्द श्रीनिवास पाटील यांच्यात ही लढत होत आहे. तरुणांच्या गळ्यातले ताईत असलेले आणि अनोख्या स्टाईलमुळे उदयनराजे लोकांमध्ये चांगलेच फेमस झाले आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या या जोडीच्या निकालाकडेदेखील सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे, हे नक्की!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News