#election2019 जळगाव जिल्ह्याचा राजकीय आढावा आणि ग्रामिण परिस्थिती

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019
  • शहराच्या दोन्ही बाजूला तापी व वाघूर या नद्या असतानाही शहराचा पाणी प्रश्न सुटलेला नाही, तेथील एमआयडीसी विकसित झालेल्या नाहीत.

1) भुसावळ - आमदार संजय सावकारे (भाजप)
मतदार संघावर सध्या भाजपाचे वर्चस्व आहे. एकनाथ खडसे समर्थक संजय सावकारे हे आमदार असून भुसावळ पालिकेवरही भाजपाची सत्ता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची या मतदार संघात तुल्यबळ ताकद असून युतीच्या जागावाटपात हा मतदार संघ सुरूवातीपासून शिवसेनेकडे होता त्यामुळे यावेळी युतीची जागावाटप कसे होते, यावर विद्यमान भाजपा आमदार संजय सावकारे यांचे भवितव्य अवलंबून असेल. शहराच्या दोन्ही बाजूला तापी व वाघूर या नद्या असतानाही शहराचा पाणी प्रश्न सुटलेला नाही, तेथील एमआयडीसी विकसित झालेल्या नाहीत. रस्ते पध्दतीचे, स्वच्छचा या नागरी सुविधांचाही अभाव आहे. मध्ये रेल्वेवरील महत्वाचे जनंक्शन असताना भुसावळ गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाते.

2) जामनेर - जलसंपदामंत्री गिरीश महाजन (भाजप)
मंत्रीमंडलातील वजनदार मंत्री गिरीश महाजन. हा मतदार संघ मराठा बहूल असला तरी अल्पसंख्याक असला तरी गिरिश महाजान गेल्या पाच टर्मपासून सातत्याने निवडून येत आहेत. सध्यस्थितीत महाजनांपुढे उमेदवार कोण उभा करयाचा हा प्रश्न कॉंग्रेस राष्ट्रवादीपुडे आहे. महाजनांना लढत देईल असा एकही चेहरा विरोधकांकडे दिसत नाही. मंत्री मंडळातील महत्वाचे जलसंपदा खाते असतानाही या मतदार संघात अथवा जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची स्थिती सुधारली नाही. गेल्या उन्हाळ्यात सर्वाधिक टॅंकर जामनेर तालुक्यात होते. हे महाजनांचे अपयश म्हणावे लागेल. तीन वर्षात मुख्यमंत्र्यांनी जामनेर तालुक्यात टेक्सटाईल पार्क उभारण्याची घोषणा केली होती, जी अद्याप कागदावरच आहे. बेरोजगारी आणि सिंचनमधला प्रश्न कायम असल्याने जामनेरचा हवा तसा विकास होऊ शकला नाही.

3) मुक्ताईनगर - माजी मंत्री एकनाथ खडसे (भाजप)
भाजपाचे जेष्ठ नेते  एकनाथ खडसे गेल्या सहा टर्मपासून आमदार असून या मतदार संघात शिवसेना व राष्ट्रवादी क़ॉग्रेसची तुल्यबळ ताकद आहे, गेल्यावेळेस शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांनी प्रचंड चुरशीची लढत दिली होती. आतामात्र खडसेंना पक्षातूनच डावलल्याने त्यांच्या उमेद्वारीवर प्रश्न चिन्हा आहे. तरी उमेद्वारी मिळणार म्हणून खडसे मतदार संघात ठाण मांजडून आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही  निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सहा टर्मपासून खडसे आमदार असले तरी मुक्ताई नगर मतदानन संघात पाण्याचे प्रश्न कायम आहेत. दुष्काळ पडल्यास मुक्ताईनगरपेक्षाही भोदवड तालुका अधिक होरपळला जातो. मतदार संघातची व्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने सिंचनासाठी खडसेंनी गेल्या २५ वर्षात भरपूर प्रयत्न केले. परंतू या मंत्रीमंडळात ३ वर्षापासून खडसे बाहेर असल्याने मतदार संघासाठी त्यांनी फारसे काम करता आले नाही, ही खंत ते बोलून दाखवतात.

4) रावेर - आमदार हरिभाऊ जावळे (भाजप)
या मतदार संघात येत्या विधानसभेतही हरिभाऊ जावळे व कॉंग्रेसचे उमेदवार शिरीश चौधरी यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून ऐनवेळी अनिल चौधरी किंवा श्रिराम पाटील अशीही नावे समोर येऊ शकता, तसे झाल्यास शिरीश चौधरींच्या विजयाचा मार्ग मोकळा असेल असे माणले जाते. या चारही उमेदवारांनी मतदार संघात जोरदार तयारी सुरू केली आहे. केळी उत्पादक मतदार संघ म्हणून  रावेरचा लौकिक आहे. या तालुक्यातील केळी विदेशातही निर्यात होते. परंकू पाहतुकीच्या परिपूर्ण सुविधा अभाली केळीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. खासदार आमदारांनी प्रयत्न करूनही ही समस्या कायम आहे. जास्त पाण्यावर केळीचे उत्पादन घेतले जात असल्याने या संपूर्ण परिसरातील भूगर्भ जलपातळी सुमारे ८०० ते १००० फूटापर्यंत खाली गेली आहे., त्यासाठी महाकाय जलपुरणभरण योजना प्रस्तावली आहे, ती अद्याप मार्गी लागलेली नाही.

5) चोपडा - आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे (शिवसेना)
या मतदार संघातील विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोणावणे यांना जळगाव पालिकेच्या घरकूल घोटाळ्यात शिक्षा झाली असल्याने मतदार संघातील उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे, शिवसेनेकडून प्रा. सोलवलणे  त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेद्वारी मिळण्याची शक्ता फार कमी अआहे,. अशावेळी शिवसेनेकडून नविन चेहरा समोर येऊ शकतो. राष्ट्रवादीकडून माजी आमदार जगदीश वळवी यांचेच नाव पुडे आहे.  यूतीच्या भवितव्यावर या मतदार संघातील लढतीचे चतित्र अवलंहबन अलेस .आदिवासी बहूल मतदार संघ असल्याने त्यंच्या शिक्षण आरोग्याची समस्या मोठी आहे,. अंकलेश्वर भर्हानपूर मार्गाची दुरावस्था मतदार संघा्चाय विकातील मोठा अडथळा आहे.

६) जळगाव शहर मतदार संघ
राजकीय स्थिती :जळगाव शहर विधानसभा मतदार संघात भाजपचे सुरेश भोळे आमदार आहेत. गेल्या वेळी त्यांनी कारागृहातून निवडणूक लढलेले शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांना पराभतू केले होते. आमदार सुरेश भोळे यांच्या रूपाने भाजपने हा मतदारसंघ ताब्यात घेतला. महापालिकेवर असलेली जैन यांची सत्ता भाजपने उलथवली आहे.शिवसेनेतर्फे आता पुन्हा सुरेशदादा जैन मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. तर भाजपतर्फे आमदार भोळेंची तयारी आहे. भाजप राष्ट्रवादी आघाडीत हा मतदार संघ कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे कॉंग्रेसतर्फे सद्यस्थिती डॉ.राध्येश्‍याम चौधरी यांचे नाव चर्चेत आहे.

वर्चस्व : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे. बहुतांश ग्रामपंचायती, विकासोंवर भाजपची सत्ता आहे. बाजार समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे.

राजकीय घडामोडी : शहर विधानसभा मतदारसंघ पाठोपाठ शिवसेनेची महापालिकेची सत्ता गेली. भाजपने सत्ता मिळविलेली बाजार समिती सेनेने शेवटच्या वर्षात पुन्हा मिळवली.
जळगाव शहर महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. आमदार भोळे यांच्या पत्नीच महापौर आहेत. शहरात अमृत योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे,रस्त्यावरील खड्डयाबाबत जनतेची नाराजी आहे.मात्र शिवाजी नगर उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर आहे ही जमेची बाजू आहे.

७) जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघ
राजकीय स्थिती :जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेचे उपनेते व सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील आमदार आहेत. गेल्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकरांचा पराभव केला होता. धरणगाव पालिका व पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आली.
 

वर्चस्व : विधानसभा मतदारसंघ, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेनेचे वर्चस्व.

राजकीय घडामोडी : शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागली.त्यांची उमेदवारीची तयारी सुरू आहे. तर राष्टवादीतर्फे गुलाबराव देवकर यांचे नाव पुन्हा चर्चेत असले तरी ज्ञानेश्‍वर महाजन व संजय पवार हे सुध्दा इच्छुक आहेत.
जळगाव ग्रामीण मतदार संघात सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विकासाकडे विशेष लक्ष दिले यावेळी त्यांनी मतदार संघातील सर्व रस्त्याची कामे केली आहेत. तसेच देवस्थानाचाही विकास केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात विरोधकाकडे फारसे मुद्ये नसतील

८) अमळनेर विधानसभा
राजकीय स्थिती : राष्ट्रवादी आणि भाजपला धक्का देत अपक्ष आमदार शिरीष चौधरी विजयी झाले. त्यांनी भाजपला समर्थन दिले. त्यांना शह देण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील नगरपालिकेतील आघाडीच्या सत्तेसह भाजपत दाखल झाले. बाजार समिती, पंचायत समितीवर भाजपचीच सत्ता आहे.

वर्चस्व : नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची सत्ता.

राजकीय घडामोडी : भाजपचे गेल्यावेळचे विधानसभेचे उमेदवार अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादीत दाखल. राष्ट्रवादीचे उमेदवार साहेबराव पाटील नगरपालिकेतील सत्तेसह भाजपत दाखल. विद्यमान आमदार शिरीष चौधरी निवडून आल्यावर भाजपचे सहयोगी सदस्य झाले. भाजपच्या स्मिता वाघ यांची विधान परिषदेवर वर्णी लागली.त्यामुळे आता शिरीश चौधरी भाजपचे किंवा अपक्ष उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अनिल भाईदास पाटील यांची तयारी सुरू आहे.मात्र कॉंग्रेसनेही या मतदार संघाची मागणी केली असून ऍड.ललीता श्‍याम पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे. मात्र भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ व त्यांचे पती उदय वाघ यांचे या मतदारसंघात वर्चस्व असल्याने त्यांच्या भूमिकेकडेही लक्ष असणार आहे.
अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूका पाडळसरे धरण पूर्ण करण्यावर गेल्या अनेक वर्षापासून लढल्या जात आहेत. मात्र ते धरण अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हा मुद्दाही या निवडणूकीत पुन्हा राहणार आहे.

९) पाचोरा विधासभा मतदार संघ
राजकीय स्थिती : राष्ट्रवादी आणि भाजपला नेटाने प्रतिकार करीत शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांचा विधानसभेत विजय. नगरपालिका, बाजार समितीसह स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेने राखल्या.

वर्चस्व : विधानसभा, बाजार समिती, नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता. पंचायत समितीवर भाजपची सत्ता. राष्ट्रवादी कॉंग्रेस हद्दपार.

राजकीय घडामोडी : यापूर्वी मैत्रीपूर्ण संबंध असलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि आमदार किशोर पाटील यांच्यात राजकीय मतभेद वाढले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे संबध विकोपाला गेले. खासदार ए. टी. पाटील यांच्याशी राजकीय संघर्ष पेटला. राष्ट्रवादीच्या नेत्या प्रा.डॉ.अस्मिता पाटील भाजपत दाखल झाल्या. शिवसेनेतर्फे किशोर पाटील हे उमेदवार असतील, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी आमदार दिलीप वाघ यांनी उमेदवारी देण्यात येईल. युती न झाल्यास भाजपकडून जिल्हाध्यक्ष डॉ.सजीव पाटील व प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांची तयारी सुरू आहे. पाचोरा विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात रस्त्याचा प्रश्‍न गभींर आहे, तर शहरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे.आमदार किशोर पाटील यांनी या प्रश्‍नाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र काही अंशी हा प्रश्‍न कायम असून विरोधक त्याचेच भांडवल करण्याची शक्‍यता आहे.

१०) चाळीसगाव विधानसभा मतदार संघ
राजकीय स्थिती : गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार राजीव देशमुुख यांचा पराभव करीत भाजपचे नवोदित उमेदवार उन्मेष पाटील विजयी झाले. पालिका, पंचायत समिती, बाजार समितीवर भाजपने सत्ता मिळविली.

वर्चस्व : नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची सत्ता.

राजकीय घडामोडी : भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेतल्या. राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला.
चाळीसगावचे भाजपचे आमदार उन्मेश पाटील हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत खासदार झाले आहेत. त्यांच्या जागेवर भाजपतर्फे मंगेश चव्हाण व उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी आमदार अनिलदादा देशमुख यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे.
चाळीसगाव मतदार संघातही रस्त्याचा प्रश्‍न कायम आहे, या शिवाय बेलगंगा कारखाना सुरू करण्याच्या मुद्यावर गेल्यावेळी भाजपचे आमदार उन्मेश पाटील यांनी निवडूक जिकंली होती. कारखाना सुरू झाला मात्र तो त्यांनी सुरू केला नाही तर चित्रसेन पाटील यांनी सुरू केला. त्यामुळे विरोधक याचे भांडवल करतील. एमआयडीसी विकासाचा मुद्या पुन्हा ऐरणीवर येणार आहे.

११) एरंडोल -पारोळा-भडगाव मतदार
राजकीय स्थिती : एरंडोल-पारोळा-भडगाव मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ.सतीश पाटील आमदार आहे. जिल्ह्यात आघाडीचे ते एकमेवर आमदार आहेत. गेल्या वेळी त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांना पराभूत केले होते.

वर्चस्व : पालिका, पंचायत समिती, बाजार समितीवर भाजपची सत्ता. नगरपालिका भाजपने जिंकली. बाजार समितीवर शिवसेनेची सत्ता आली.

राजकीय घडामोडी : करण पवार यांनी भाजपत प्रवेश करून पालिकेत भाजपची सत्ता आणली.तर शिवसेनेतून भाजपत आलेले मच्छिंद्र पाटील यांच्या पत्नी उज्वला पाटील भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. त्या याच मतदार संघातील आहेत.

राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे आमदार डॉ.सतीश पाटील यांची तयारी सुरू आहे. तर शिवसेनेतर्फे चिमणराव पाटील पुन्हा मैदानात उतरणार आहोत. जर युती झाली नाही तर भाजपतर्फे नगराध्यक्ष करण पवार यांची तयारी असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला पाटीलयांचीही भाजपतर्फे तयारी सुरू आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News