#election2019 हिंगोली जिल्ह्याचा राजकीय आढावा आणि ग्रामिण परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019

1)हिंगोली विधानसभा मतदारसंघ
हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार तान्‍हाजी मुटकुळे यांची उमेदवारी निश्चित असून त्‍यांनी प्रचार सुरु केला. मात्र युती होणार की नाही याबाबत संभ्रमावस्‍था असल्‍यामुळे युती न झाल्‍यास या ठिकाणी शिवसेनेला उमेदवार शोधावा लागणार आहे. काँग्रेसकडून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. वंचितच्‍या उमेदवाराची अद्यापही घोषणा झाली नाही.

1)हिंगोली विधानसभा मतदारसंघ
हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार तान्‍हाजी मुटकुळे यांची उमेदवारी निश्चित असून त्‍यांनी प्रचार सुरु केला. मात्र युती होणार की नाही याबाबत संभ्रमावस्‍था असल्‍यामुळे युती न झाल्‍यास या ठिकाणी शिवसेनेला उमेदवार शोधावा लागणार आहे. काँग्रेसकडून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. वंचितच्‍या उमेदवाराची अद्यापही घोषणा झाली नाही.

हिंगोली विधानसभा मतदारसंघात हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीचा विस्‍तार, सेनगाव येथे औद्यागिक वसाहत उभारणी, कयाधू नदीवरील बंधाऱ्यांचे प्रश्न आहेत.

2)कळमनुरी विधानसभा मतदारसंघ
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आघाडीची जागा काँग्रेसला आहे. विद्यमान आमदार डॉ. संतोष टारफे यांची उमेदवारी निश्चित आहे. युती झाल्‍यास नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रम आहे. शिवसेनेचे संतोष बांगर, भाजपचे गजानन घुगे तर रासपचे विनायक भिसे यांनी प्रचार सुरु केला आहे. वंचित आघाडीकडून जिल्‍हा परिषद सदस्य अजित मगर यांचे नाव आघाडीवर आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मोरवाडी पंचवीस गाव पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा प्रश्न आहे. तसेच सीमा सुरक्षा बलाचे कार्यालय सुरु झाले असले तरी या ठिकाणी संपूर्ण बटालियनचे कामकाज सुरु झाले नाही. बहुतांश भाग आदिवासी क्षेत्रात असल्‍यामुळे ग्रामीण रस्‍त्‍यांचा प्रश्न कायम आहे.

3)वसमत विधानसभा मतदारसंघ
वसमत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्‍या उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे. ऐनवेळी शिवसेनेकडून राजू चापके यांची उमेदवारी जाहिर होण्याची शक्‍यता आहे. तर भाजपचे ॲड. शिवाजी जाधव यांनी प्रचार सुरु केला आहे. युतीमध्ये येथील जागा शिवसेनेची आहे. आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची उमेदवारी निश्चित असून त्‍यांनी प्रचार सुरु केला आहे. वंचित आघाडीकडून या ठिकाणी जवळाबाजारचे सरपंच फैसल पटेल यांची उमेदवारी निश्चित आहे.

वसमत येथील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न कायम आहे. पूर्णा नदीवरील रद्द झालेल्‍या बंधाऱ्यांचा प्रश्न मागी लावणे आवश्यक आहे. हळद प्रक्रिया उद्योग सुरु करणे गरजेचे आहे. पिण्याच्‍या पाण्यासाठी तेवीस गाव सिद्धेश्वर व वीस गाव पुरजळ योजनेची दुरुस्‍ती गरजेचे आहे.

4)पैठण (संदीपान भुमरे, शिवसेना)
युतीत हा मतदार संघ शिवसेनेच्या तर आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो. शिवसेनेकडून पुन्हा संदीपान भुमरे हेच मैदानात राहतील तर राष्ट्रवादीकडून संजय वाघ चौरे, अनिल जाधव यांची नावे चर्चेत आहेत. यूती नाही झाली तर भाजपाकडून सुनिल शिंदे, तुशार शिसोदे हे मैदानात राहण्याची शक्यता आहे. मतदार संघात जायकवाडी धरणाचं पाणी, तालुक्यातील मोठ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बंद पडलेली पैठण एमआयडीसी, रस्ते अशा अनेक समस्या आहेत.

5)फुलंब्री (हरिभाऊ बागडे, भाजपा)
युतीत हा मतदार संघ भाजपाच्या वाट्याला आहे. तर आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला आहे. हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून माजी आमदार डॉ कल्याण काळे हेच मैदानात राहतील. युती नाही झाली तर शिवसेनेकडून राजेंद्र ठोंबरे आणि त्र्यंबक तुपे यांची नावे  चर्चेत आहेत. मतदार संघात रस्ते, पाणी, रोजगार मतदार संघात औरंगाबाद शहरातील दहा वार्ड आणि त्यातील समस्या शेंद्रा एमआयडीसीतील समस्या हे प्रश्न आहेत.

6)सिल्लोड (अब्दूल सत्तार, कॉंग्रेस)
अब्दूल सत्तार यांनी कॉंग्रेसचा राजिनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र युतीमध्ये हा मतदार संघ भाजपाच्या वाट्याला आहे, त्यामुळे अब्दूल सत्तार यांना भाजपाकडून विरोध होतोय. भाजपाकडून येथे सांडू पाटील लोखंडे, सुरज बनकर हे इच्छूक आहेत, तर कॉंग्रेसकडून प्रभाकर पालोदकर हे मैदानात राहण्याची शक्यता आहे. मतदार संघामध्ये औरंगाबाद सिल्लोड रखडलेला रस्ता, सिल्लोड शहराचा विकास, पिकविमा, सोयगावचा रखडलेला विकास अशा समस्या आहेत.

7)कन्नड (हर्षवर्धन जाधव, शिवसेना)
हर्षवर्धन जाधव यांनी राजिनामा देऊन लोकसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आता ते त्यांच्या शिवस्वराज्य बहुजन पक्षातर्फे मैदानात राहणार आहेत. युतीमध्ये हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येतो तर आघाडीमध्ये हा मतदार संघ कॉंग्रेसच्या वाट्याला आहे.  शिवसेनेकडून येथे केतन काजे, उदयसिंग राजपूत, आण्णासाहेब शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत येथे राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याने राष्ट्रवादीने मतदार संघावर दावा केला आहे. मतदार संघामध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, पिकविमा, पिककर्ज, कन्नड शहराचा विकास अशा समस्या आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News