#election2019 औरंगाबाद जिल्ह्याचा राजकीय आढावा आणि ग्रामीण परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 October 2019
  • तसेच कॉंग्रेसकडून मोहसिन अहेमद, युसूफ मुकाती यांची नावे चर्चेत आहेत. रस्ते, पाणी, कचरा, ड्रेनेज आणि गुंठेवारी, सिडकोचे लिज होल्ड टू फ्री होल्ड या समस्या आहेत (तीन ते साडे तीन लाख घरांचा मोठा प्रश्न).

1)औरंगाबाद पुर्व (अतुल सावे, भाजपा)
अतूल सावे यांच्या विरोधात एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी मैदानात राहणार आहेत. युती नाही झाली तर शिवसेनेकडून राजू वैद्य किंवा राजेंद्र जंजाळ हे उमेदवार असतील. तसेच कॉंग्रेसकडून मोहसिन अहेमद, युसूफ मुकाती यांची नावे चर्चेत आहेत. रस्ते, पाणी, कचरा, ड्रेनेज आणि गुंठेवारी, सिडकोचे लिज होल्ड टू फ्री होल्ड या समस्या आहेत (तीन ते साडे तीन लाख घरांचा मोठा प्रश्न).

२) औरंगाबाद मध्य
या मतदार संघातून एमआयएमटे एम्तियाज जलिल विजयी झाले होते. आता ते खासदार झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजिनामा दिला आहे. एमआयएमकडून येथे अतिक मोतीवाला, अनवर खान यांची नावे चर्चेत आहेत. तर युतीमध्ये हा मतदार संघ शिवसेनेकडे असल्याने येथे माजी खासदार प्रदिप जैस्वाल, बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत आहेत. या मतदार संघात रस्ते, पाणी, कचरा, जुण्या शहरातील अरुंद रस्ते, गटारी, जोपडपट्ट्या यांच्या समस्या आहेत.

३) औरंगाबाद पश्चिम (संजय शिरसाट, शिवसेना)
युतीत हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. संजय शिरसाट यांच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे जितेंद्र देहाडे हे मैदानात राहण्याची शक्यता आहे. युती नाही झाली तर भाजपाकडून राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत. वंचित आघाडीकडून अमित भुईगळ हे मैदानात राहण्याची शक्यता आहे. या मतदार संघात पाणी, रस्ते, कचरा तसेच वाळुज एमआयडीसी मधील समस्या वाळुजचा विकास सातारा-देवळाईमधील पायाभूत सुविधा या समस्या आहेत.

४) गंगापूर (प्रशांत बंब, भाजपा)
गंगापूर मतदार संघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला असाल तरी येथे भाजपाचे प्रशांत बंब आमदार आहेत, त्यामुळे शिवसेनेला येथे मतदार संघ सोडवण्यासाठी कसरत करावी लागेल. सध्या येथे प्रशांत बंब यांच्या विरोदात कॉग्रेसकडून किरण डोनगावकर निवडणुक लढवू शकतात, तसेच शिवसेनेकडून येते देवयानी डोनगावरकर, संतोष माने इच्छूक आहे. पिकविमा, मोठ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, खराब रस्ते अशा अनेक समस्यांना तोड द्यावे लागते.

५) वैजापूर (भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर, राष्ट्रवादी)
हा मतदार संघ आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. तर यूतीत हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर,  यांच्या विरोदात शिवसेनेचे रमेश बोरनारे, आर. एम वाणी हे मैदानात राहू शकतात, यूती नाही झाली तर एकनाथ जाधव, दिनेश परदेशी नारायण तुपे यांची नावे चर्चेत आहे. मतदार संघात रस्ते, प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पिकविमा, लष्करी आळी मदत हे प्रश्न आहेत.

६) पैठण (संदीपान भुमरे, शिवसेना)
युतीत हा मतदार संघ शिवसेनेच्या तर आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो. शिवसेनेकडून पुन्हा संदीपान भुमरे हेच मैदानात राहतील तर राष्ट्रवादीकडून संजय वाघ चौरे, अनिल जाधव यांची नावे चर्चेत आहेत. यूती नाही झाली तर भाजपाकडून सुनिल शिंदे, तुशार शिसोदे हे मैदानात राहण्याची शक्यता आहे. मतदार संघात जायकवाडी धरणाचं पाणी, तालुक्यातील मोठ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बंद पडलेली पैठण एमआयडीसी, रस्ते अशा अनेक समस्या आहेत.

७) फुलंब्री (हरिभाऊ बागडे, भाजपा)
युतीत हा मतदार संघ भाजपाच्या वाट्याला आहे. तर आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला आहे. हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून माजी आमदार डॉ कल्याण काळे हेच मैदानात राहतील. युती नाही झाली तर शिवसेनेकडून राजेंद्र ठोंबरे आणि त्र्यंबक तुपे यांची नावे  चर्चेत आहेत. मतदार संघात रस्ते, पाणी, रोजगार मतदार संघात औरंगाबाद शहरातील दहा वार्ड आणि त्यातील समस्या शेंद्रा एमआयडीसीतील समस्या हे प्रश्न आहेत.

८) सिल्लोड (अब्दूल सत्तार, कॉंग्रेस)
अब्दूल सत्तार यांनी कॉंग्रेसचा राजिनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र युतीमध्ये हा मतदार संघ भाजपाच्या वाट्याला आहे, त्यामुळे अब्दूल सत्तार यांना भाजपाकडून विरोध होतोय. भाजपाकडून येथे सांडू पाटील लोखंडे, सुरज बनकर हे इच्छूक आहेत, तर कॉंग्रेसकडून प्रभाकर पालोदकर हे मैदानात राहण्याची शक्यता आहे. मतदार संघामध्ये औरंगाबाद सिल्लोड रखडलेला रस्ता, सिल्लोड शहराचा विकास, पिकविमा, सोयगावचा रखडलेला विकास अशा समस्या आहेत.

९) कन्नड (हर्षवर्धन जाधव, शिवसेना)
हर्षवर्धन जाधव यांनी राजिनामा देऊन लोकसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आता ते त्यांच्या शिवस्वराज्य बहुजन पक्षातर्फे मैदानात राहणार आहेत. युतीमध्ये हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येतो तर आघाडीमध्ये हा मतदार संघ कॉंग्रेसच्या वाट्याला आहे.  शिवसेनेकडून येथे केतन काजे, उदयसिंग राजपूत, आण्णासाहेब शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत येथे राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याने राष्ट्रवादीने मतदार संघावर दावा केला आहे. मतदार संघामध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, पिकविमा, पिककर्ज, कन्नड शहराचा विकास अशा समस्या आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News