#election2019 अहमदनगर जिल्ह्याचा राजकीय आढावा आणि ग्रामीण परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 20 October 2019
 • पारनेर शहराच्या पाणी वितरणासाठी कायमस्वरुपी सोय होण्याची अनेक दिवसांची मागणी
 • तालुक्‍यातील सिंचनासाठी पाणी अपुरे. त्यामुळे वर्षानुवर्षे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायम.

1. नगर शहर :

 • एमआयडीची अवस्था अत्यंत दयनीय असून, वर्षानुवर्षे डी-झोनचा प्रश्‍न प्रलंबित आहे.
 • नगरमधील उड्डाणपुलाचे काम अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, त्यास मुहूर्त मिळत नाही.
 • बाह्यवळण रस्त्याची निर्मितीपासूनच दुरावस्था आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम आहे.
 • नगरमध्ये कचरा डेपो व तेथील खत प्रकल्पांचा प्रश्‍न वर्षानुवर्षे असल्याचे स्थानिकांना त्याचा त्रास आहे.
 • शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या बारा उपनगरांमधील विकासकामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.

2. पारनेर :

 • पारनेर शहराच्या पाणी वितरणासाठी कायमस्वरुपी सोय होण्याची अनेक दिवसांची मागणी
 • तालुक्‍यातील सिंचनासाठी पाणी अपुरे. त्यामुळे वर्षानुवर्षे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायम.
 • तालुक्‍याच्या हद्दीतून पावसाळ्यात नद्या दुथडी भरुन वाहतात; मात्र, पाणीप्रश्‍न कायम.
 • सुपा एमआयडीसीमध्ये अनेक नवीन उद्योग आणण्यासाठी पाठपुराव्याची गरज.
 • पठार भागात शाश्‍वत पाणी योजना होण्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा.

3. श्रीगोंदे :

 • श्रीगोंदे तालुक्‍यातील औद्योगिक वसाहतीमध्ये समस्या प्रलंबित
 • फळांची मोठी निर्मिती; परंतु शीतगृह नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी
 • कुकडीच्या लाभक्षेत्रात असुनही राजकीय वादात श्रीगोंदा पाण्यापासून वंचित.
 • फळप्रक्रीया उद्योग उभारण्याची मागणी; सर्वच सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी.
 • तालुक्‍यातील युवकांना दुष्काळामुळे शेतमधील कामेह घडल्याने रोजगाराचा प्रश्‍न.

4. कर्जत-जामखेड :

 • सीना धरणाचे लाभक्षेत्र असुनही 28 गावांत नेहमीच पाणीटंचाई
 • शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात सुविधांची वानवा
 • एमआयडीसीचा विकास होत नसल्याने बेरोजगारीचा प्रश्‍नही कायम.
 • पर्यटन क्षेत्र सिद्धटेक विकासाच्या बाबतीत कायम पिछाडीवर.
 • ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर ऊसभावाचे व पाण्याचे संकट कायम

5. पाथर्डी-शेवगाव :

 • ताजनापूर टप्पा क्रमांक दोन, हा प्रकल्प निधीअभावी बंद पडला.
 • शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेसाठी निधी न मिळाल्याने काम बंद.
 • शेवगाव-मिरी रस्त्याच्या कामाची वर्षानुवर्षे दुरुस्तीची मागणी.
 • शहरटाकळी व 24 गावांची बंद झालेली पाणी योजना सुरु गरज.
 • हातगाव व इतर गावांसाठी असलेली पाणी पुरवठा योजना ठप्प.

6. नेवासे :

 • ज्ञानेश्‍वर तिर्थक्षेत्र आराखड्यातील पंचाहत्तर टक्के कामे पेंडींग
 • नेवासे शहरातील नगर पंचायत प्रस्तावित पोलिस ठाणे, वसाहत प्रलंबित
 • नवीन तहसील कार्यालयाचे काम अनेक वर्षांपासून रखडले
 • नेवासे तालुका क्रीडा संकुलाचे काम पंधरा वर्षांपासून "जैसे थे'
 • तालुका कृषी कार्यालयात स्वतंत्र इमारत नसल्याने गैरसोय.
 • नेवासे शहरातील नवीन पाणी योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित.
 • पांढरीपूल एमआयडीसी परिसरात नवीन उद्योग आलेच नाहीत.

7. राहुरी :

 • राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालय, पोलिस वसाहत दुरस्तीची मागणी.
 • राहुरी शहराची सुधारीत पाणी योजना निधी अभावी रखडली आहे.
 • लघु औद्योगिक वसाहतीचा पाणीप्रश्‍न व नवीन उद्योग आणण्याची मागणी
 • मुळा व भंडारदरा धरणातील तालुक्‍याच्या हक्काचे पाणी मिळतच नाही.
 • वांबोरी व भागडा उपसा योजनेच्या जलवाहिन्यांची दुरस्तीची मागणी.
 • ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरील रस्ते दुरुस्ती वर्षानुवर्षे रखडली.

8. श्रीरामूपर :

 • श्रीरामपूर शहर व तालुक्‍यातील अनेक रस्त्यांची वर्षानुवर्षे दुरावस्था
 • तालुक्‍यातील जाफराबाद, गोंडेगाव येथील गावांत कायमच पाणीटंचाई
 • एमआयडीसीमध्ये मोठे प्रकल्प नसल्याचे येथून फारसा रोजगार नाही.
 • अशोक वगळता अन्य कारखाना नसल्याने तरुणांच्य रोजगाराचा प्रश्‍न.
 • निळवंडे प्रकल्प सुरु न झाल्यास श्रीरामपूरच्या पाण्यात कपात होणार असल्याची भीती
 • गोदावरी उजव्या कालव्याचा पाणी प्रश्‍न कायम; नव्याने फक्‍त सोडवणुकीच्या चर्चा.

9. शिर्डी :

 • निळवंडे धरणाखालील कालव्यांची कामे प्रलंबित
 • गोदावरी कालव्यांच्या नुतनीकरणाचा प्रश्‍न
 • कोल्हार-कोपरगाव रस्त्याची कायमच दुरावस्था
 • गणेश कारखाना कार्यक्षेत्रील बंधाऱ्यांच्या नुतनीकरण रखडले.
 • शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडींग सुविधा नाहीत.

10. कोपरगाव :

 • गोदावरी डाव्या कालव्याचे नुतनीकरण रखडले
 • गोदावरी नदीवरील ब्रिटीश कालीन पुलाची दुरुस्ती
 • पाणीप्रश्‍नासाठी चार व पाच क्रमांकाच्या तलावाचे भिजत घोंगडे
 • तालुक्‍यातील 13 गावांना निळवंडेच्या कालव्यांची प्रतीक्षा
 • गोदावरी नदीमधील वाहून गेलेल्या बंधाऱ्यांची आणखी दुरावस्था

11. संगमनेर :

 • जिल्हा विभाजन झाल्यास संगमनेर शहरात मुख्यालयाचा दर्जा मिळण्याची अडचण.
 • संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागातील तळेगाव, निमोण गटात पिण्याच्या पाणीप्रश्‍न.
 • भोजापूर चारीचे काम शेवटपर्यंत झाल्याने सिंचनाच्या पाणीप्रश्‍न उभा राहिला.
 • तालुक्‍यातील बहुतांश गावांत उन्हाळ्यात कायम टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होतो.
 • निळवंडे प्रकल्पाखालील चाऱ्या व पोटचाऱ्यांची कामे वर्षानुवर्षे रखडली.

12. अकोले :

 • आदीवासी भागातील उपसा सिंचन योजना बंद पडल्या आहेत.
 • विस्थापीत आदीवासी शेतकऱ्यांना अजून पाणीच मिळाले नाही.
 • तालुक्‍यात नव्या रोजगाराची निर्मितीच नसल्याने बेरोजगारीचा प्रश्‍न
 • हरिश्‍चंद गडापासून थोलारखिंड जोडल्यास रहदारीचा प्रश्‍न सुटेल.
 • निळवंडे नदीवरील पिंपरकणे गावातील पुलाचे काम वर्षानुवर्षे रखडले
 • कोतुळचा पूल वारंवार पाण्याखाली जातो; उंची वाढविण्याची मागणी रखडली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News