#election2019 जालना जिल्ह्याचा राजकीय आढावा आणि ग्रामिण परिस्थिती जालना 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 18 October 2019
  • अर्जून खोतकर आणि कॉंग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना मतदारांनी संधी दिली आहे. गेल्या २०१४  विधानसभा निवडणुकीत या दोघांमध्ये लढत झाली होती.

शहरातील नगरपालिका कॉंग्रेस आणि राष्टवादीच्या ताब्यात आहे तर जिल्हापरिषद ही शिवसेना आणि राष्ट्रवादी या युतीच्या ताब्यात आहे. सातत्याने अर्जून खोतकर आणि कॉंग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना मतदारांनी संधी दिली आहे. गेल्या २०१४  विधानसभा निवडणुकीत या दोघांमध्ये लढत झाली होती, त्यावेळी या मतदार संघातून बसपाचे रशिद मेहमूद हेही रिंगणात उतरल्यामुळे कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन होऊन शिवसेनेचे अर्जून खोतकर निसटत्या मतांनी विजय झाला.

या मतदार संघात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यानंतर शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न गेल्या १२ ते १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. या शहरात औधोगिक क्षेत्राच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते, त्यामुळे त्यांना व्यवसायासाठी काहीतरी सुविधा देणे हे अपेक्षित आहे. विशेषत: पुरेसा विजपुरवठा आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिल्यास येथील व्यवसाय भरभराटीला लागेल.

बदनापूर (नारायण कुचे - भाजपा)

हा मतदार संघ अनुसुचित जाती व जमातीसाठी राखिव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढल्यामुळे भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी श्री कुचे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या मागे भक्कम पाठबळ उभे केले. त्यामुळे श्री कुचे यांनी शिवसेनेचे संतोष सांबरे यांचा पराभ केला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बबलू चौधरी यांनीही जोरदार लढत दिल्याने शिवसेनेचे संतोष सांबरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. या मतदार संघात मुस्लिम समाजांची मते निर्णायक आहेत. एमआयएम आणि बहुजन वंचित आघाडी यांच्यात युती झाली तर मात्र कुचे यांच्यासमोर प्रश्न निर्माण होऊ शकतो. क़ॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा समाजत कितपत साथ देईल ते विवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. या मतदार संघामध्ये पाणी, विज आदी प्रश्न आहेत. परंतू गेल्या पाच वर्षामध्ये श्री कुचे यांनी खासदार दानवे यांच्या मदतीने मोठ्याप्रमाणावर निधी मिळवून विकास साधला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांची त्यांना पसंती असू शकेल. या मतदार संघातील ग्रामिण भागामध्ये अद्यापही म्हणावा तसा विकास झाला नाही. शहराशी जोडणारे थेट रस्ते नसल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावाला बसस्थानक मिळू शकले नाही, हाही चर्चेचा मुद्दा आहे.

परतूर (बबनराव लोणीकर, पाणी पुरवठा मंत्री - भाजपा)

परतूर मतदार संघाचे प्रतिनीधीत्व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे करत आहेत. गेल्या पाच वर्षापासून लोणीकरांनी मोठ्याप्रमाणावर या मतदार संघात विकास कामे केली असल्याने मतदारांमध्ये त्यांच्या विषयी आस्था आहे. वॉटर ग्रिप यासह शहरातील तसेच ग्रामिण भागातील रस्त्यांची कामे झाल्यामुळे मतदार त्यांना या निवडणुकीमध्ये पसंती देतील. यामतदार संघामध्ये कॉंग्रेसच्या वतीने माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया आणि राजेश राठोड यांनी दावा केला आहे. पक्षाच्या वतीने उमेदवारी कोणाला जाहिर होते, यावरून चित्र स्पष्ट होईल. या मतदार संघात बहुजन वंचित आघाडीचे काही प्रमाणात प्रभाव दिसून येत आहे. या जातीय समिकरणाचा जेथली यांनी किती फायदा होतो, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. या मतदार संघात अद्यापही औद्योगिक क्षेत्राचा विकास होणे अपेक्षित आहे. यामुळे  या परिसरातील युवकांना राजगाराची संधी मिळू शकेल. उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची उभारणी केल्यास या भागातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळू शकते.

भोकरदन (संतोष दानवे, भाजपा)

केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे संतोष दानवे हे चिरंजीव आहेत. गेल्या निवडणुकीत श्री संतोष दानवे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा पराभव करू वर्चस्व निर्माण केले. कार्यकर्त्यांशी असलेले जाळे हे संतोष दानवे यांची शक्ती ठरली आहे, त्यामुळे या निवडणुकीत ते पुन्हा विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. वडील रावसाहेब दानवे यांच्या पुण्याईमुळे त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मतदार संघात मोठा निधी मिळवून विकास कामे केली आहेत. युवक, शेतकरी यांच्याशी  कायम संपर्क असल्याने या निवडणुकीत त्यांना लाभ होऊ शकेल. असे असले तरी या मतदार संघामध्ये काही समस्या आहेत, त्याच्यामध्ये विजेचा प्रश्न,  ग्रामिण भागात असलेले रखडलेला रस्त्यांचा प्रश्न, शुध्द पाणी पुरवठा आदीचा उल्लेख करता येईल.

घनसावंगी (राजेश टोपे - राष्ट्रवादी कॉंग्रेस)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार राजेश टोपे यांनी या मतदार संघामध्ये शैक्षणिक संस्था सहकारी संस्थांची उभारणी करून विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या निवडुकीमध्ये शिवसेनेचे हिकमत उडाण यांच्यात त्यांची लढत झाली होती. या मतदार संघात पाणी, रस्ते, आदी प्रश्न अद्यापही कायम आहेत. हेच या निवडणुकीमध्ये चर्चेचे मुद्दे होऊ शकतात. या मतदार संघामध्ये विज, पाणी आदी प्रश्न कायम आहेत. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News