निवडणुकांच्या तारखा जाहीर !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019
  • विद्यार्थी परिषद निवडणूक जाहीर; 
  • ३० ऑगस्टला मतदान 

मुंबई : विद्यार्थी संघटना आणि महाविद्यालय विश्‍वाचे लक्ष लागून राहिलेल्या विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागातील विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या निवडणुकीची आचारसंहिता २० ऑगस्टपासून लागू होणार आहे; तर विविध पदांसाठी ३० ऑगस्टला मतदान होणार आहे. 

मुंबई विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठी विभाग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालय विद्यार्थी परिषदेसाठी वर्गप्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांसाठी निवडणूक होईल. 

या निवडणुकीसाठी प्राचार्य/संचालक यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सोईनुसार चार तासांची मतदानाची वेळ जाहीर करावी, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. निकालानंतर महाविद्यालयांना पदाधिकाऱ्यांची माहिती विद्यापीठाकडे सादर करावी लागणार आहे.

निवडणूक वेळापत्रक

  • मागास प्रवर्ग प्रतिनिधींच्या आरक्षणासाठी सोडत : १९ ऑगस्ट, दुपारी ३ वाजता 
  • अर्जदाखल करण्याची तारीख : २३ ऑगस्ट 
  • नामनिर्देशन अर्जांची छाननी : २६ ऑगस्ट 
  • अर्ज मागे घेण्याची तारीख : २८ ऑगस्ट सकाळी १० ते दुपारी १ 
  • उमेदवारांची अंतिम यादी : २८ ऑगस्ट दुपारी ३ वाजता 
  • मतदान : ३० ऑगस्ट सकाळी ११ ते दुपारी ३ 
  • निकाल : ३० ऑगस्ट दुपारी ४ वाजता 
  • विद्यापीठ विद्यार्थी संघाची तात्पुरती यादी : ७ सप्टेंबर 
  • अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी पदांसाठी मतदान : २४ सप्टेंबर 
  • निकाल - २७ सप्टेंबर 
  • विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेची घोषणा - १३ सप्टेंबर सायंकाळी ४ वाजता

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News