या नेत्याची मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे

नवी दिल्ली : मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे.

कालच परदेश दौऱ्यावरून आलेले काँग्रेसचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मान्यतेनंतर संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गायकवाड यांच्या नियुक्तीची घोषणा केली. 

ऐन लोकसभा निवडणुकीवेळी संजय निरुपम यांच्याकडून मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद काढून मिलिंद देवरा यांच्याकडे सोपवण्यात आले होते; मात्र निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरच्या काही आठवड्यांनी देवरा यांनीही राजीनामा दिला.

अर्थात, या राजीनाम्यासोबत केंद्रीय संघटनेत मोठी जबाबदारीची तयारी दर्शवल्यामुळे मिलिंद देवरा यांच्यावर टीकाही झाली होती. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने मुंबई प्रदेश काँग्रेसची धुरा गायकवाड यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News