राज्यात प्रत्येक उद्योगातील नोकऱ्यांमध्ये 80 टक्के स्थानिक पाहिजेतच, नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

महाराष्ट्रात सध्या मोठ्याप्रमाणात उद्योगांची उभारणी सुरू आहे, त्यात महत्वाचे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य देण्याचा आदेशही शासनाकडून देण्यात आला आहे, याप्रकारची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. संबंधीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ नये यासाठी हे धोरण आखल्याची माहितीही त्यांनी मंत्रालयात बोलताना दिली.

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या 3 हजार 52 मोठ्या प्रकल्पांची सुरूवात झाली आहे. यात पर्यवेक्षीय श्रेणीत 84 तर इतर श्रेणीत 90 टक्के स्थानिकांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे सुक्ष्म, लघू आणि माध्यम अशा एकूण 10 लाख 26 हजार 992 उपक्रमांच्या माध्यमातून सुमारे 60 लाख रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई  यांनी दिली. 

संबंधीत भूमिपुत्रांवर कोणत्याच प्राकरचा अन्याय होऊ नये, त्यासाठी यातील सगळे नियम कठोर बणवले आहेत, तसेच स्थानिक भूनिपुत्रांना 80 टक्के जागा मिळाल्याच पाहिजेत, नाहीतर कंपन्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहन रक्कमेचा परतावा रोखून धरला जाईल, असंही मत देसाई यांनी यावेळी मांडले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News