सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस- जेडीएस आघाडीचे कसोशीचे प्रयत्न !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा सोमवारी
  • मतदानाची शक्‍यता कमीच

बंगळूर : काँग्रेस- जेडीएस आघाडीने सरकार वाचविण्यासाठी निर्णायक पण निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा पूर्ण करून सायंकाळी मतदान घेण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला आहे. पण, मतदान प्रक्रिया सोमवारीही पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आहे. मतदान आणखी काही दिवस लांबविण्यासाठी आघाडीने योजना आखली असल्याचे समजते.

व्हिप जारी करण्याचा अधिकार संबंधित विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला आहे; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या हक्कावर गदा आली आहे. यासंबंधी आघाडीने याचिका दाखल करून आधीच्या निकालावर पुनर्विचार करावा, अशी विनंती केली आहे. निकाल येईपर्यंत विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान होण्याची शक्‍यता कमी आहे. मुंबईतील असंतुष्ट आमदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही सुरुच आहेत. भाजपही असंतुष्ट आमदारांचा कोणाशी संपर्क होणार नाही, याची काळजी घेत आहे. 

काँग्रेसला मुख्यमंत्रिपद; ‘जेडीएस’चा प्रस्ताव
‘जेडीएस’ने काँग्रेसला मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. सरकार वाचविण्यासाठी व काँग्रेसबरोबरची मैत्री कायम ठेवण्यासाठी ‘जेडीएस’च्या नेत्यांची कोणत्याही त्यागाची तयारी असल्याचे काँग्रेस नेते शिवकुमार यांनी सांगितले. ‘जेडीएस’कडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर येताच काँग्रेसमधील हालचाली वाढल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News