शिक्षणात बदल घडवण्याचे साधन म्हणजे...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019

 शिरगाव :शिक्षण हे सामाजिक बदल घडवण्याचे उपयुक्त साधन आहे, मुलांना चांगले शिक्षण देऊन देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे काम हे शिक्षकच करू शकतात, त्यामुळे शिक्षकांनी क्षमता ओळखून शिक्षणात उच्च दर्जाचे काम करावे, असे प्रतिपादन जळगाव दीपस्तंभ फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यजुर्वेद महाराज यांनी केले. शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

कणेरीमठ येथील सिद्धगिरी महासंस्थानतर्फे जिल्हा परिषद शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी कार्यशाळा झाली. यावेळी मुप्पीन काडसिद्धेश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. जळगावच्या दीपस्तंभ फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यजुर्वेद महाराज यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, विचाराला सकारात्मक अधिष्ठान आहे. जोपर्यंत विचार बदलत नाही, तोपर्यंत काहीच होत नाही, आपण कशासाठी जगतोय हे माहीत नाही. त्यामुळे आपण दिशाहीन आयुष्य जगत आहे. भाकरी, नोकरी, आणि छोकरी यांच्या पलीकडे लोक विचार करतील तेव्हाच आपला देश समृद्ध होईल. 

यावेळी शिक्षणाधिकारी विश्वास सुतार, मठाचे कार्यकारी संचालक आर. डी. शिंदे, प्रल्हाद जाधव, प्रिया शिंदे आदी उपस्थित होते.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News