... तरी शिक्षणाची कास सोडली नाही

सुशांत सांगवे
Saturday, 26 January 2019

आम्रपाली कांबळे सन २०००-२००१ मध्ये सतरा वर्षाची असताना आम्रपाली बारावी उत्तीर्ण झाल्या. कोणत्याही आई-वडीलांना वाटेल त्या प्रमाणे त्यांच्याही लग्नाचा विचार आई- वडील करु लागले. घरातील सर्व सुशिक्षित, पण चार बहिणी, एक भाऊ, त्यात आम्रपाली वयाने मोठ्या असल्याने लवकर लग्नाचा निर्णय घेणाऱ्या आई- वडीलांचा खुप रागही आला पण त्यांच्यावरील समाजाचा दबाव आणि ताण पाहता आम्रपाली यांनी शिक्षणातून माघार घेत लग्नास होकार दिला. समाजकार्य पदवीचे प्रथम वर्ष होताच २००२ साली शहाजी बनसोडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

आम्रपाली कांबळे सन २०००-२००१ मध्ये सतरा वर्षाची असताना आम्रपाली बारावी उत्तीर्ण झाल्या. कोणत्याही आई-वडीलांना वाटेल त्या प्रमाणे त्यांच्याही लग्नाचा विचार आई- वडील करु लागले. घरातील सर्व सुशिक्षित, पण चार बहिणी, एक भाऊ, त्यात आम्रपाली वयाने मोठ्या असल्याने लवकर लग्नाचा निर्णय घेणाऱ्या आई- वडीलांचा खुप रागही आला पण त्यांच्यावरील समाजाचा दबाव आणि ताण पाहता आम्रपाली यांनी शिक्षणातून माघार घेत लग्नास होकार दिला. समाजकार्य पदवीचे प्रथम वर्ष होताच २००२ साली शहाजी बनसोडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर एकेदिवशी शहाजी यांच्याकडे समाजकार्य पदवी आणि पदव्युत्तर पदवी पुर्ण करण्याची सुप्त इच्छ त्यांनी व्यक्त केली.

पण संसार, मुलांची जबाबदारीही पेलायची होती. परंतु शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे संसार सांभाळत समाजकार्य पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांना ओढ लागली ती पदव्युत्तर शिक्षणाची. पण पदव्युत्तर पदवी लातुर जिल्ह्यात त्यावेळेस सुरु झाले नव्हते. दुसरीकडे कुटुंबातील जबाबदाऱ्या आणखी वाढत गेल्या. लग्न समारंभ, पाहुणे, नातीगोती, सासर-माहेर यामुळे शिक्षणाकडे आणखीनच दुर्लक्ष झाले आणि पदव्युत्तर शिक्षणाची आशा कमी झाली. पण पतीने पदव्युत्तर शिक्षणासाठी आम्रपाली यांना बळ दिले. तेवढ्यात विद्यापीठाच्या उपकेंद्रात पदव्युत्तर समाजकार्य शिक्षण सुरु झाले. तीथे प्रवेश झाला. 

विद्यापीठात शिक्षण घेण्यास जाणारी विद्यार्थीनी असल्या तरी त्या दोन मुलींची आई होत्या. वर्गातील सर्व मुले-मुली २०-२१ वर्षाची आणि या सर्वांत थोरली. त्यामुळे या मुलां-मुलींमध्ये मिसळण्याचा दबाव तर होताच पण टेंन्शनही होतच की, दहा वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर शिक्षणाची नव्याने सुरुवात करायची होती. अशा वेळी प्रा. अनिल जायभाये यांच्यासारख्या स्त्री वादी विचारांच्या प्राध्यापकांनी आम्रपाली यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून शिक्षण आणि वयाचा काही संबंध नसतो, इच्छाशक्ती असले की, अशक्य गोष्टी शक्य होतात याची जाणीव आम्रपाली यांना झाली. न्युनगंड हळुहळु नाहीसा झाला. 

या सर्व बदलामुळे आम्रपाली यांना वाचनाची आवड लागली. यामध्ये ताराबाई शिंदेंचे स्त्री पुरुष तुलना असेल किंवा कमला भसीन यांचे पुरुषत्व, लिंगभाव यासंदर्भातील लिखाण असेल, या सर्व वाचनातून भारतातील स्त्रीप्रश्न , जातीचा प्रश्न याची नेमकी गुंतागुंत कशी आहे, यासंदर्भात आम्रपाली यांचे आकलन वाढण्यास मदत झाली. त्याचबरोबर स्वतःच्या जात म्हणून असेल अथवा स्त्री म्हणून आलेल्या अनुभवांकडे पाहण्याची एक चिकित्सक व सम्यक दृष्टी तयार होण्यासही मदत झाली. दुसरीकडे अभ्यास ही मन लावुन सुरु होता. त्यामुळे पहिल्याच सेमीस्टरमध्ये संपूर्ण वर्गातून त्या पहिल्या आल्या. विशेष म्हणजे वर्गात पहिले येण्याचा आलेख अंतिम वर्षापर्यंत तसाच ठेवला आणि विद्यापीठ –उपकेंद्रात पदव्युत्तर पदवी च्या अंतिम परीक्षेतही सर्वप्रथम आल्या. जिद्द आणि चिकाटी असेल तर यश मिळवणे कठीण नाही, हेच त्यांनी दाखवून दिले. सध्या आम्रपाली ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान वएसकेएफ - वुमन या शिष्यवृती प्रकल्पावर मराठवाडा प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News