शिक्षण हे ज्ञान मिळण्याचे सर्वोत्तम साधन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • डॉ. श्रीकांत पाटील; वारणा कारखाना, शारदा वाचन मंदिरतर्फे आयोजन
  • ‘‘आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये घरा -घरामध्ये होणारा संवाद हरवत चालला असून, घरातील नाती, माती आणि संस्कृती जपण्याची गरज आहे.’’

वारणानगर : शिक्षण हे ज्ञान मिळण्याचे प्रभावी सर्वोत्तम साधन आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे साधन हे अर्थार्जनाचे साधन बनू लागल्याचे साहित्यिक  व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले. येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि  शारदा वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितवर्षा व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

उदघाटन  शारदा वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष विजयकुमार कोले, ‘जनसुराज्य’चे सरचिटणीस विजयसिंह जाधव, बझारचे सरव्यवस्थापक  शरद महाजन, वारणा बॅंकेचे संचालक प्रमोदराव कोरे यांच्या उपस्थितीत झाले. आदर्श वाचक पुरस्कार केशव आडूरकर (जाखले)  यांना दिला.

दुसरे पुष्प गुंफताना कथाकथनकार हिंमत पाटील(नागठाणे) म्हणाले, ‘‘आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये घरा -घरामध्ये होणारा संवाद हरवत चालला असून, घरातील नाती, माती आणि संस्कृती जपण्याची गरज आहे.’’ शारदा वाचनालयाचे कार्याध्यक्ष व्ही. एस. कोले, माणिक बाबर, प्रा. के. जी जाधव, एस. ए. कुलकर्णी, संदीप पाटील, अजित पाटील, एम. बी. मलमे, राजू जमदाडे, तानाजी ढेरे, हणमंत दाभाडे, ग्रंथपाल बाबासाहेब कावळे आदी उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News