यामुळे पावसात भजी खाणं तुम्हाला महागात पडू शकते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019

अंगावर पाऊस झेलत असताना गरमा गरम भजी खात गप्पांचा फड रंगतो तेव्हाचा पावसाचा आनंद वेगळाच असतो. पाऊस, चहा  आणि गरमागरम भजी यांची मज्जा काही वेगळीच आहे. पावसाळ्यात चहा आणि गरम भजींवर ताव मारला नाही तर तुम्ही पावसाचा आनंद काय घेतला?

अंगावर पाऊस झेलत असताना गरमा गरम भजी खात गप्पांचा फड रंगतो तेव्हाचा पावसाचा आनंद वेगळाच असतो. पाऊस, चहा  आणि गरमागरम भजी यांची मज्जा काही वेगळीच आहे. पावसाळ्यात चहा आणि गरम भजींवर ताव मारला नाही तर तुम्ही पावसाचा आनंद काय घेतला? असे विचारणारे तुम्हाला असंख्य भेटतील. त्यामुळे पाऊस पडला की घरात सर्रास भजीचा बेत रंगतो. कढईत गरमागरम कांदाभजी सोडल्यावर ती खाण्याचा मोह कुणाला होणार नाही? मात्र या भजी जरा बेतानंच खा कारण पावसात जास्त भजी खाणं तुम्हाला महागात पडू शकतं. 

पावसात आजूबाजूचं वातावरण थंड होतं, हवेत आर्द्रता वाढते. अशा वेळी पचायला हलके पदार्थ खाण्याचा सल्ला  दिल्ला जातो. त्यातून तळलेले पदार्थ हे पचायला खूपच जड असतात. म्हणूनच तेलकट पदार्थ न खाणं हे आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असतं. अशा वातावरणात तेलकट पदार्थ खाल्ले की  ते पचायला जड असल्यानं अपचन  आणि  इतर त्रास जाणवू लागतो. म्हणूनच तेलकट पदार्थ पावसात अजिबात खाऊ नये. याव्यतिरिक्त  ज्या पदार्थांत पाण्याचे प्रमाण अधिक असेन असे पदार्थही पावसात खाणं आवर्जून टाळावं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News