अमेरिकेतील घर आणि लाखो रुपयांच्या पगारावर पाणी सोडत तो रमला शेतीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

तरुण पिढी पुन्हा एकदा आता शेतीकडे वळते आहे. मुळचे गुजरातचे रहिवासी असलेले विवेक शाह आणि वृंदा शाह हे दाम्पत्य कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीत घर आणि लाखो रुपयांच्या पगारावर पाणी सोडत गुजरातमध्ये सेंद्रिय शेती करण्यात रमले आहे.

नादियाद: तरुण पिढी पुन्हा एकदा आता शेतीकडे वळते आहे. मुळचे गुजरातचे रहिवासी असलेले विवेक शाह आणि वृंदा शाह हे दाम्पत्य कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीत घर आणि लाखो रुपयांच्या पगारावर पाणी सोडत गुजरातमध्ये सेंद्रिय शेती करण्यात रमले आहे. विवेक शाह आणि वृंदा शाह हे दाम्पत्य अमेरिकेतील सिलिकाॅन व्हॅलीत एका कंपनीत नोकरीवर होते. भरपूर पगार आणि स्वतःचे घर, अस सर्व काही सुरळीत सुरू असताना दोघांच्याही डोक्यात सेंद्रिय शेती करण्याचा विचार आला. सिलिकाॅन व्हॅलीतील नोकरी सोडत त्यांनी थेट शेत गाठले. 

भारतात परतलेल्या विवेक व वृंदा यांनी गुजरातमधील नादियाद शहराजवळच दहा एकर शेती खरेदी केली. दोघांनीही सेंद्रिय शेती करण्यापूर्वी शेती संबधित अभ्यासक्रम पूर्ण केला. आता दोघेही शेतीत कष्ट घेत असून, बाजरी, गहू, आलू, केळी, पपई, कोथिंबीर व वांगी आदी पिके आणि फळभाज्यांचे उत्पादन घेत आहेत. 

असा सोडवला पाण्याचा प्रश्न... 
शेतीसाठी पाण्याचे महत्त्व जाणत शाह दाम्पत्याने शेततळी तयार केली. जलपूर्नभरण पद्धतीने या शेततळ्यात २० हजार लिटर पाणी जमा केले आहे. हे पाणी पिकांसाठी भरपूर काळ वापरत असून, ते शुद्ध राहण्यासाठी पाणी शुद्ध करणारे झाडे लावली आहे. शाह दाम्पत्याने बहुपिक आणि आंतरपीक पद्धतीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर पीक घेण्यास सुरुवात केली आहे. आंतरपीक म्हणून तुळशी व लिंबाची रोपे लावली आहेत. शेती करताना किटक नियंत्रण करणे आवश्यक असते आणि तेच आमच्यासाठी आव्हान होते असे शाह यांनी सांगितले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News