नेटकऱ्यांनी केले गोविंदाला ट्रोल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • गोविंदाला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना
  • माझी हॉलीवूड चित्रपटात काम करण्याची क्षमता नाही
  • ट्रोल करणे तसेच चुकीच्या अफवा पसरवणे बंद करा

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात बहुधा प्रत्येक सेलिब्रिटीलाच नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही सेलिब्रिटी हे ट्रोलिंग सकारात्मकरीत्या घेतात. काही सोशल मीडियाद्वारे आपले मत स्पष्टपणे मांडतात.

आता अभिनेता गोविंदाला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी गोविंदाने मला ‘अवतार’ या हॉलीवूड चित्रपटाची ऑफर आली होती, असे विधान एका मुलाखतीदरम्यान केले होते. त्याचे हेच विधान नेटकऱ्यांनी उचलून धरत त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

यावर गोविंदा म्हणतो, ‘गोविंदाला इतक्‍या मोठ्या चित्रपटाची ऑफर कशी काय येऊ शकते हा विचार करणे साफ चुकीचे आहे. माझी हॉलीवूड चित्रपटात काम करण्याची क्षमता नाही, असा तुम्ही विचार करूच शकत नाही. ट्रोल करणे तसेच चुकीच्या अफवा पसरवणे बंद करा.’ गोविंदाने ट्रोलर्सची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News